केडगावच्या स्वाभिमानासाठी ‘अपक्ष’ पॅनल मैदानात! कोथरूडचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, रेणुका मातेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटला
केडगावच्या स्वाभिमानासाठी ‘अपक्ष’ पॅनल मैदानात! कोथरूडचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, रेणुका मातेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटला अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक १६ मध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे. केडगावचा ‘स्वाभिमान’ आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी चार तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. २ जानेवारी रोजी ग्रामदैवत…