मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकर

मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार; प्रभाग १५ (ब) मध्ये बदलाचा नवा इतिहास घडणार – दत्ता सोमनाथ गाडळकर
प्रभाग क्रमांक १५ (ब) मधील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन आणि लोकसेवेचं स्पष्ट वचन देत दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी राजकीय मैदानात ठाम पाऊल टाकले आहे. “मोदीजींची प्रेरणा रुजणार, विकासाचं कमळ फुलणार” या विचारधारेवर विश्वास ठेवत प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करून नव्या परिवर्तनाची सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर “विकासाचं व्हिजन, लोकसेवेचं वचन” या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून गाडळकर यांनी नियोजनबद्ध व पारदर्शक विकासाची हमी दिली आहे.
प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या थेट ऐकून त्यावर वेळबद्ध उपाययोजना करणे, केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, तसेच तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विकास कार्यक्रम राबवणे, हा त्यांच्या कार्यआराखड्याचा केंद्रबिंदू आहे. सबका साथ, सबका विकास या संकल्पनेतून प्रभाग १५ (ब) ला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा संकल्प आहे.
“आपल्या प्रभागात बदल आणि नवा इतिहास घडणार” असा ठाम विश्वास व्यक्त करत दत्ता सोमनाथ गाडळकर यांनी नागरिकांना विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, येणाऱ्या काळात प्रभाग १५ (ब) मध्ये विकासाचं कमळ नक्कीच फुलणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *