नवनागपूर जिल्हा परिषद गट आदर्श बनवण्याचा निर्धार; विकास कामांचा अवशेष भरून काढणार – सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे
नवनागपूर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधत हा गट आदर्श बनवण्याचा ठाम निर्धार सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत रखडलेली व अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत गटातील प्रत्येक गावात समतोल विकास घडवून आणणार असल्याचे सौ. शेवाळे यांनी सांगितले. विशेषतः अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, भूमिगत गटार योजना, आरोग्य केंद्रांची सुधारणा आणि शाळांच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.
महिला, युवक व शेतकरी यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्यात येणार असून शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
“राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर लोकसेवेसाठी असावे,” या भूमिकेतून विकासाचा अनुशेष भरून काढत नवनागपूर जिल्हा परिषद गटाला प्रगतीच्या मार्गावर नेणार असल्याचा विश्वास सौ. सोनुबाई विजयराव शेवाळे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेमुळे गटातील नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.


