देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास
देहरे/नवनागापूर जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या नावाने गटात बदलाची स्पष्ट लाट निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये अपूर्ण राहिलेल्या विकास कामांचा जाब आता जनता मागत असून, “यावेळी फक्त आश्वासने नाहीत, तर ठोस कामेच हवीत,” असा आक्रमक सूर मतदार बंधू-भगिनींनी लावला आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर गटातील नागरिक वर्षानुवर्षे त्रस्त आहेत. विकासाचा ढोल वाजवला गेला, मात्र प्रत्यक्षात कामे अपूर्णच राहिली. या पार्श्वभूमीवर कु. ऋतुजा जालिंदर कदम या तरुण, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाच्या रूपाने पुढे येत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान मिळाले आहे.
“मागच्या वेळेला अपूर्ण राहिलेले आपले सर्वांचे स्वप्न या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करायचे आहे,” हा निर्धार आता फक्त घोषवाक्य न राहता जनआंदोलन बनत असल्याचे चित्र आहे. देहरे/नवनागापूर गटातील मतदार बंधू-भगिनी एकजुटीने विकासासाठी सज्ज झाले असून, यावेळी गटात निर्णायक बदल घडवण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला जात आहे.
आगामी काळात या गटातील राजकीय समीकरणे बदलणार हे स्पष्ट असून, कु. ऋतुजा जालिंदर कदम यांच्या रूपाने जिल्हा परिषद गटाला नवे, आक्रमक आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळणार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे
देहरे/नवनागापूर गटात बदलाची लाट; कु. ऋतुजा जालिंदर कदम


