नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभे
उपाध्यक्षपदी गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसे
अहिल्यानगर :
नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील चोभे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब गदादे, सचिवपदी शशीकांत पवार तर खजिनदारपदी अविनाश निमसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगर तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक नुकतीच जेष्ठ पत्रकार लहुकुमार चोभे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष सुनील हारदे यांनी सुनील चोभे यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेस उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड सर्वानुमते करण्यात आली.
या बैठकीस माजी अध्यक्ष योगेश गुंड, जितेंद्र निकम, नितीन देशमुख, नागेश सोनवणे, ज्ञानदेव गोरे, आजिनाथ शिंदे, संजय ठोंबरे, भाऊ होळकर आदी पत्रकार उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील चोभे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकार संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील. पत्रकारांचे हित जपताना समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. पत्रकार संघ अधिक सक्षम, संघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.”
नगर तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन पदाधिकाऱ्यांचे दै. नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, दै. पूण्यनगरीचे संपादक राजेंद्र झोंड, दै. पुढारीचे संपादक संदीप रोडे, दै. लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे, दै. नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.


