हिंगणगाव येथे पुलाच्या कामाचा शुभारंभ

हिंगणगाव येथे पुलाच्या कामाचा शुभारंभ

अहिल्यानगर तालुक्यातील हिंगणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन नगर-पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

हिंगणगाव गावाजवळील या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर पुलावरून पाणी वाहत असे. त्यामुळे गावाचा रस्ता बंद होत होता. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, तर ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. 

या समस्येबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव ढगे व उपसरपंच अशोक सोनवणे, रामदास सोनवणे यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची दखल घेत आमदार दाते यांनी तात्काळ निधी मंजूर करून पुलाच्या कामास हिरवा कंदील दिला.

भूमिपूजन प्रसंगी हिंगणगावचे सरपंच पोपटराव ढगे, जिल्हा देखरेख संघाचे नवनिर्वाचित संचालक रामदास तात्या सोनवणे, उपसरपंच अशोक सोनवणे, दिलीपजी दाते, दीपक सोनवणे, छबुराव कांडेकर, चेअरमन रंगनाथ दरंदले, व्हाईस चेअरमन अर्जुन पाडळे, बन्सी दरंदले, शिवदास त्रिंबके, दत्तात्रय दरंदले तसेच हिंगणगाव-हमिदपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनी हिंगणगाव येथील दुसऱ्या पुलाचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले. या पुलाच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुरक्षित होणार असून शेतकरी व ग्रामस्थांची मोठी समस्या कायमची दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *