हिंगणगाव येथे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झावरे वस्ती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
हिंगणगाव (ता. नगर) येथे महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर झावरे वस्ती येथील बहुप्रतिक्षित रस्त्याच्या कामाचे शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता अखेर मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उद्घाटनप्रसंगी हिंगणगावचे सरपंच पोपटराव ढगे, जिल्हा देखरेख संघाचे संचालक रामदास सोनवणे, सेवा संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ दरंदले, झावरे साहेब, दादासाहेब झावरे, कोल्हे मेजर, सावित्राराम झावरे, एकनाथ झावरे, बबन झावरे, बन्सी दरंदले, अंकुश सोनवणे, कैलास दरंदले, दत्तू दरंदले, दादा पाडळे, रोहिदास सोनवणे, अजित झावरे, प्रवीण झावरे, अनिल दरंदले, अतुल गवारे तसेच महिला व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शाळकरी मुले, शेतकरी व नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हिंगणगाव येथे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झावरे वस्ती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन


