नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

नवनागापूर गटातून रुतुजा जालिंदर कदम यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांचा आग्रह

मांजरसुंबा ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना बाळगून विकासकामांची शाश्वत दिशा निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे समाजभिमुख व्यक्तिमत्व रुतुजा जालिंदर कदम यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

गावोगाव राबवलेल्या विकास उपक्रमांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे कदम यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक सोयी, रस्ते विकास तसेच महिलांच्या स्वावलंबनासाठी करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे ‘आदर्श गाव’च्या दिशेने देहरे गटाची वाटचाल गतीमान झाली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “गावाच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक आहे. जालिंदर कदम यांच्या नेतृत्वातूनच हा विकास अधिक सक्षमपणे पुढे जाऊ शकतो.”

यामुळेच देहरे गटात कदम यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य पाठींबा मिळत असून, त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

चौकट-
आठ वर्षांच्या जनसंपर्क व विकासाच्या जोरावर निवडणुकीत यश निश्चित -जालिदर कदम

मागील पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत अल्प फरकाने पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्या पराभवातून धडा घेत हार न मानता गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात नागरिकांशी थेट संपर्क वाढवून विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली. गावागावात, वॉर्डनिहाय नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला आहे. विकासकामांसोबतच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांशी नाते अधिक दृढ करण्यात आले. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आठ वर्षांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला विश्वास आणि विकासाची ठोस कामगिरी पाहता येणाऱ्या निवडणुकीत यश निश्चित असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जनतेच्या अपेक्षांवर खरा उतरून पुढील काळात आणखी व्यापक विकास साधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *