निंबळक (ता. नगर) प्रतिनिधी :
“स्वतःच्या तत्त्वाशी प्रामाणिक असलं की, कर्तुत्वाचे पुरावे देण्याची गरज भासत नाही,” या विचारावर ठाम राहून जिल्हा परिषद निंबळक गटात प्रामाणिक व पारदर्शक काम करणारे नेतृत्व म्हणून श्री. माधवराव लामखडे साहेब यांची ओळख निर्माण झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे.
मागील कार्यकाळात त्यांनी निंबळक गटातील पाणीपुरवठा योजना, ग्रामीण रस्ते दुरुस्ती, शाळांच्या इमारतींचे नुतनीकरण, अंगणवाडी सुविधा सुधारणा तसेच शेतकरी व युवकांसाठी विविध विकासकामे मार्गी लावली. विकासकामांमध्ये निधीचा योग्य वापर, कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता यावर त्यांनी विशेष भर दिला.
ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून त्या सोडवणे, ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही विकासकामांच्या जोरावर आणि स्वच्छ प्रतिमेच्या बळावर ते मतदारांसमोर जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. “काम केले आहे, म्हणून पुन्हा संधी द्या,” असा संदेश ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत.
निंबळक गटातील विकासाला गती देण्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टीकोन या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“स्वतःच्या तत्त्वाशी प्रामाणिक असलं की, कर्तुत्वाचे पुरावे देण्याची गरज भासत नाही,- माधवराव लामखडे ( जिल्हा परिषद सदस्य )

