रेव्हेन्यू अॅण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट सर्व्हटस् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर
रेव्हेन्यू सोसायटीची १०३ वी वार्षिक सभा संपन्न
अहमदनगर-रेव्हेन्यू अॅण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट सर्व्हटस् को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, अहमदनगर या संस्थेची सन २०२३-२४ ची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दि. २१.०९.२०२४ रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरु सभागृहात पार पडली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदिप तरटे, उपाध्यक्ष राजेश घोरपडे, संतोष मांडगे, सुरेश राऊत, बाबासाहेब दातखिळे, गणेश गर्कळ, प्रविण बोरुडे, प्रदिप चव्हाण, हरिभाऊ सानप, विजय हरिश्चंद्रे, प्रदिप अवचर, वृषाली करोसिया, सुनंदा गरकड, सनी जाधव, विकास मोराळे, संतोष ताठे व जनरल सेक्रेटरी बाबासाहेब पालवे उपस्थित होते.
सभेमध्ये संस्थेच्या www.revenue-society.com या वेबसाईटचे उद्घाटन अतुल चोरमारे यांचे हस्ते करण्यांत आले. त्यानंतर सभासदांना सन २०२३-२४ सालासाठी दिलेल्या ८.२५% वर्गणी व्याजास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. या सभेमध्ये सभासदांनी उपविधी दुरुस्तीसाठी मान्यता देऊन, सभासद कर्ज मर्यादा रु.२० लाख वरुन रु. २५ लाख करणेत आली. तांतडीचे कर्ज रु ३०,०००/- वरुन रु. ५०,०००/- पर्यंत करणेत आले. मयत सभासदांचे वारसांसाठी मदत ३ लाख रुपयांवरुन ६ लाख करणेत आली. माऊली ट्रस्टचे वाचनालयास रु. ५० हजारांची पुस्तके देण्यास मंजूरी देणेत आली. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ट्रॉफी देवून व सेवानिवृत्त सभासदांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करणेत आला.
यावेळी सर्व विभागांच्या संघटनांचे पदाधिकारी संतोष तनपुरे, अक्षय फलके, गणेश जाधव, डॉ. मुकुंद शिंदे, रवि डिकुज, राजेंद्र आंधळे, प्रशात हासे, राहुल मापारी, सुरेश राऊत यांचा सत्कार करणेत आला.
या सभेमध्ये माजी पदाधिकारी कैलास साळुंके, राजेंद्र आंधळे, शंकर जगताप, दिपक कारखिले, विजयकुमार धोत्रे, भाऊसाहेब डमाळे, संतोष तनपुरे, सुरेश जेठे, दिनेश पुसदकर, सभासद सुरेश आघाव, गिरीष गायकवाड, कालीचरण मखरे, दिलीप जायभाय, अतुल सुपेकर, महेंद्र शिंदे, संजय जायभाय व इतर सभासदांनी सहभाग घेतला.
या सभेमध्ये सर्व सभासदांनी भाग घेवून संस्थेच्या केडगांव येथील स.नं. ३४० मधील ७.५० एकर ही ग्रीन झोन मधून येलो झोन करुन विकसीत करण्यासाठी परवानगी दिली. सुत्रसंचालन प्रसन्ना पाठक यांनी केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सभासदांचे आभार व्यक्त केले.