खा. लंकेकडून रस्ते, पुलांची दुरूस्ती 

खा. लंकेकडून रस्ते, पुलांची दुरूस्ती 

खा. लंके यांनी केली आरोग्य केंद्राची स्वच्छता 

अहिल्यानगर : प्रतिनिधी

     आपत्तीग्रस्त खडकी,  अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, सारोळा कसार, भोरवाडी, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये रविवारी नीलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपला मावळा संघटनेच्या वतीने विविध रस्ते,  पूल तयार करण्यात आले.  

   गेल्या आठवडयात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावांतील रस्ते,  पूल वाहून गेले. जनावरे दगावली. या आपत्तीनंतर खा. लंके यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना किराणा तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देत नागरीकांना दिलासा दिला.  

    विविध गावांमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने खा. लंके यांनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन नीलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून मदत मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.अनेक ठिकाणी रस्ते व पु पूल वाहून गेले होते, ते दुरूस्त करण्यात आले. 

    रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्व गावांमध्ये एकाच वेळी या कामांना सुरूवात करण्यात आली. खा. लंके यांनी यावेळी विविध गावांमध्ये जात या मदतकार्यात सहभाग नोंदविला. 

▪️चौकट

आरोग्य केंद्राची स्वच्छता 

वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूलाचे पाणी शिरल्यामुळे केंद्रात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. चार फुटापर्यंत पाणी साचलेल्या या केंद्रास खा. लंके यांनी  भेट दिल्यानंतर त्यांनी स्वतः हाती खोरे घेत संपूर्ण केंद्रातील गाळ उचलण्यात आला. गाळ उचलण्यात आल्यानंतर संपूर्ण इमारत धुवून काढण्यात आली. पाणी शिरल्यामुळे आरोग्य केंद्रातील उपचार बंद होते. नीलेश लंके प्रतिष्ठानची रूग्णवाहिका मागविण्यात येऊन येणाऱ्या रूग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले. 

▪️अकोळनेर 

महेत्रे वस्तीला जोडणारे ३ पूल व रस्ता, जाधववाडीला जोडणारे वाहून गेलेले २ पूल, दरोडी मळयाला जोडणारा वाहून गेलेला २०० मिटर रस्ता, थोरात वस्तीला जोडणारा रस्ता,सारोळा रस्ता ते देशमुख मळा रस्ता. 

▪️अस्तगांव 

खेकड दरा, तरोडी वस्ती, नाणेकर वस्ती, गाढवे वस्ती, खडकी ते जाधव वस्ती रस्ते.

▪️वाळकी 

बाजारतळावरील नदीलगतचा वाहून गेलेला भराव, जंदरे वस्तीवरील विविध रस्ते, पुरामध्ये वाहून गेलेल्या जनावरांची विल्हेवाट

▪️भोरवाडी

नवीन खडकवाडीला जोडणारा पूल ९० टक्के वाहून गेला होता. तो पूल तयार करण्यात आला. वड वस्ती-खैरे वस्ती वाहून गेलेल्या रस्त्याबरोबरच मुरमीकरण करत छोटे मोठे रस्ते खुले करण्यात आले.

▪️खडकी 

खडकी ते जाधववस्ती अकोळनेर रस्ता 

▪️सारोळा कासार 

सारोळा कासार ते काळे मळा रस्त्यावरील पुल, दत्त मंदीर रस्ता, काळेवस्ती ते जाधववाडी रस्ता, स्मशानभूमी दुरूस्ती

▪️चौकट

यांत्रिक उपकरणे आणि ४०० स्वयंसेवक

५० जेसीबी, २२ ढंपर, ३० ट्रॅक्टर, ५ पोकलेनच्या मदतीने नीलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपला मावळा संघटनेचे ४०० स्वयंसेवक तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. याशिवाय या मोहीमेत सहभागी झालेल्या खाजगी व शासकीय डॉक्टरांच्या टीमने अतिवृष्टीमुळे ज्या ग्रामस्थांना आजार झाले आहेत, त्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले, औषधेही देण्यात आली. 

▪️चौकट

जनावरांची तपासणी 

पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीमने प्रत्येक गावातील प्रत्येक गोठ्यात जाऊन जनावरांची तपासणी केली. आवष्यक तिथे उपचार करून औषधेही देण्यात आली. या टीममध्येही ३५ खाजगी व शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.भोरवाडी येथील शेतकऱ्याच्या गायीच्या पोटातील वासरू आडवे आले असता टीमधील डॉ. कासार व डॉ. जगताप यांनी तिथे जाता सेवा दिली. त्यामुळे गाय व वासरू दोघांचेही प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *