पोपट पवार, अण्णा हजारे यांचे कार्य लक्षात घेऊन यापुढे वधू-वरांनी वाटचाल करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
प्रतिनिधी । अहिल्यानगर
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्यासारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहे.आणि पद्मश्री पोपटराव पवार सारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहे. पण त्यांच्या या कार्याची प्रेरणा देखील या ठिकाणी वधू-वरांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अहिल्यानगर शहरात आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचे सुपुत्र प्रसन्न व अशोक भगत यांची कन्या तनुजा यांच्या लग्न समारंभसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना मानपत्र देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप आमदार अरुण जगताप ,आमदार काशिनाथ दाते, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीधर परदेशी, नाशिक विभाग पोलीस विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आळंदीचे निरंजन महाराज, कॅप्टन अशोक कुमार खरात यावेळी उपस्थित होते
त्यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना फडणवीस म्हणाले,वधू-वरांनी भावी आयुष्यामध्ये चांगले काम करत आपल्या जीवनात आपला संसार सांभाळावा, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, पोपटराव पवार यांच्या निमंत्रणावरुन आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान अण्णा हजारे देखील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आमच्या परिवाराच्या वतीने सर्वांचे अतिशय मनःपूर्वक स्वागत करतो आणि वधू-वरांना शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं आणि त्यांच्या हातून उत्तम कार्य घडावं, आणि ज्या प्रकारे आपला घर आणि संसार तर आपण सांभाळतोच पण आज अण्णा हजारेंसारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहे.त्यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना फडणवीस म्हणाले,वधू-वरांनी भावी आयुष्यामध्ये चांगले काम करत आपल्या जीवनात आपला संसार सांभाळावा, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देत त्यांच्या हातून देशाची व समाजाची सेवा घडो असे सांगून त्यांनी यांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे जावो असे आशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.
–
चौकट
देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले मानपत्र
श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेला गीता उपदेश हा हे मानपत्र देवेंद्र फडणवीस यांना यावेळी प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक अन्न हजारे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.