राणी लंके यांच्या प्रचार फेऱ्यांना नगर तालुक्यात प्रतिसाद
पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, वाजत गाजत प्रचार फेरीचे स्वागत
अहिल्यानगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी नीलेश लंके यांच्या नगर तालुक्यातील चौथ्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरूवारपासून सुरू करण्यात आलेल्या प्रचार फेऱ्यांचे नागरिकांकडून गावागावामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी तसेच वाजत गाजत राणी लंके यांच्या प्रचारफेऱ्यांना प्रतिसाद मिळत आहे.
राणी लंके यांची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच त्यांनी आरोग्य यज्ञाच्या माध्यमातून गावागावांशी संपर्क साधला होता. त्यानंतर बुथ कमिटयांच्या माध्यमातून त्या दुसऱ्यांदा गावांमध्ये पोहचल्या. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा घोंगडी बैठकीच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधला. नागरीकांच्या समस्या समजाउन घेत त्याची नोंद घेऊन त्या समस्या दुर करण्याची ग्वाही दिली. ज्या समस्या तात्काळ माग लावणे शक्य होते त्या माग लावण्यात आल्या.
घोंगडी बैठकांच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहचल्यानंतर आता चौथ्यांदा राणी लंके या प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना सामोऱया जात आहेत. गुरूवारी त्यांनी नगर तालुक्यातील निमगांव वाघ येथून सकाळी प्रचार फेरीस प्रारंभ केला. निमगांव वाघामध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेप्ती, निंबळक, नव नागापुर, वडगांव गुप्ता, शिंगवे नाईक , इस्मालपुर, देहरे, नांदगांव या गावांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला.
शुक्रवारी सकाळी कामरगांव येथून प्रचार फेरीस सुरूवात करण्यात आली. त्यानंतर चास, अकोळनेर, अरणगांव, वाकोडी, देउळगांवसिध्दी, घोसपुरी, सारोळा कासार या गावांमध्ये प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून राणी लंके व त्यांच्या समवेतच्या महिलांनी मतदारांशी संवाद साधला.
▪️चौकट
मतदारांच्या प्रेमाने भारावले
गेल्या दोन दिवसांपासून माझ्यासह माझ्या सहकारी भगिनी नगर तालुक्यातील गावांमध्ये प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना सामोरे जात आहोत. या प्रचार फेऱ्यांच्या निमित्ताने आम्ही चौथ्यांदा नागरीकांशी संवाद साधत आहोत. गावागावांमध्ये आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत असून नागरीकांकडून प्रेम मिळत आहे. त्यांच्या या प्रेमामुळे मी भाराऊन गेले आहे.
राणी लंके
महाविकास आघाडीच्या उमेदवार
▪️चौकट
लंके परिवाराच्या योगदानाचे फलित
खा. नीलेश लंके हे २४ तास ३६५ दिवस नागरीकांसाठी उपलब्ध असतात. त्यांच्या पश्चात आमचे संपूर्ण कुटूंब मतदार संघातील नागरीकांच्या सुख, दुःखात सहभागी होण्यासाठी तत्पर असते. जीवा भावाची माणसं हीच लंके परिवाराची खरी संपत्ती आहे. मतदारसंघात आम्हाला जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे तो खा. नीलेश लंके यांच्या माध्यमातून आमच्या परिवाराने दिलेल्या योगदानाचे हे फलित आहे.
राणी लंके
उमेदवार
▪️चौकट
नगरच्या लेकीचे कोडकौतुक !
मतदारसंघातील नगर तालुक्यातील अरणगांवचे माहेर असलेल्या राणी लंके या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या असून त्यांना संपूर्ण मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या विजयाची औपचारीकातच शिल्लक आहे.नगरची लेक विधानसभेत गरजणार आहे, त्याचे नगरकरांना कोडकौतुक आहे.