शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या उमेदवारीचा उद्या फैसला

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या उमेदवारीचा उद्या फैसला

शिवसैनिकांच्या मेळाव्यातून जाणुन घेणार मते

पारनेर नगर मतदारसंघात महाआघाडीत बिघाडी होणार की घडी पुन्हा घट्ट होणार

नगर – शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले पारनेर विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीकडुन इच्छुक आहेत . मात्र महाआघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणीताई लंके यांना जाहिर झाली .
शिवसेने कडुन इच्छुक असणारे कार्ले बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत . असे झाल्यास महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे . शेतकरी प्रश्नांसाठी सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्ले यांना उमेदवारीची अपेक्षा होती . आता पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी नगर तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा उद्या गुरुवारी दि २४ रोजी निमगाव वाघा येथे आयोजीत केला आहे . यात सर्वांचे मते जाणुन घेतल्यानंतर कार्ले निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *