गोगावंच्या सरपंच सौ सुरवसे यांच्या तर्फे काँग्रेसचे नूतन अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन पाटील यांचा सन्मान*

गोगावंच्या सरपंच सौ सुरवसे यांच्या तर्फे काँग्रेसचे नूतन अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन पाटील यांचा सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती माननीय श्री मल्लिकार्जुन पाटील यांची नुकतीच अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. त्याचा योग साधून गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक सौ वनिता सुरवसे यांनी शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
. सक्षम विरोधी पक्षाची बाजू मांडण्यात आपल्याला यश येवो, माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे आपल्या पक्षाच्या असून त्यांच्याकडून वागदरी विभागास आज पर्यंत काही निधी मिळाला नाही, आता आपण अक्कलकोट तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष झाला आहात, माझे गाव गोगाव सहित वागदरी भागातील गावांना खासदार निधी मिळवून द्यावे ही विनंती सरपंच सुरवसे यांनी केली केली. आम्ही आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे निकटवर्तीय आहोत म्हणून आम्हाला खासदार निधी देणार नाहीत का? असा प्रश्न केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आवरेना..पण आपल्या गोगाव सहित इतर गावांना सुद्धा यावेळी नक्की निधी मिळवून देणार असे आश्वासन पाटील साहेबांनी दिले.
. काँग्रेस अध्यक्ष पाटील यांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचा 16 जून रोजी वाढदिवस असतो, पण दरवर्षी नेहमी वाढदिवसादिवशी पाटील साहेब बाहेरगावीच असतात म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सौ वनिता सुरवसे यांनी त्यांचा वाढदिवस उशिरा साजरा करून त्यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडून देशाची, समाजाची, खास करून अक्कलकोटकरांची चांगली सेवा घडो अशी स्वामी चरणी प्रार्थना केली.
यावेळी उद्योगपती मधुकर सुरवसे, इंजिनीयर सुधीर गायकवाड, यशस्वी पाटील शामल गायकवाड, संपूर्ण सुरवसे कुटुंब आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *