नगर तालुक्यात बाबुर्डी घुमट शाळेची भरारी प्रांजली सांगळे निबंध स्पर्धेत प्रथम; अंजली भक्ती , स्वाती ,वैष्णवी आदिती यांची बाजी
■
छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नगर तालुक्यातून बाबूर्डी घुमट शाळेची प्रांजली सांगळे हिचा निबंध स्पर्धेत नगर तालुक्यातून प्रथम क्रमांक आला. अंजली परभाणे (तिसरी ), भक्ती परभाणे (चौथी ), स्वाती परभाणे (पाचवी ), वैष्णवी कदम(सातवी ), आदिती लोखंडे (दहावी )यांनी गुणवत्तेत भरारी मारल्याची माहिती बाबूर्डी घुमट शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदू धामणे यांनी दिली.
नगर तालुक्यातून प्रथम तीन व सात उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. यापूर्वीही २०२४- २५ या वर्षात जिल्हा पातळीवर झालेल्या इस्रो सहलीसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये भक्ती परभाणे आणि अंजली परभाणे या विद्यार्थिनींनी स्थान मिळवले होते. यासाठी बाबुर्डी घुमट शाळेतील वर्गशिक्षिका वर्षा कासार व आबासाहेब लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेच्या या विशेष यशाबद्दल नगर
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, विस्तार अधिकारी निर्मला साठे , केंद्रप्रमुख संजय धामणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ , पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच ज्योती परभाणे यांनी अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संदीप परभाणे , उपाध्यक्ष सचिन भगत , तानाजी परभाणे,पवन लांडगे भाऊसाहेब चव्हाण , भाऊसाहेब लांडगे , जनार्धन माने , शाळेतील शिक्षक, आबासाहेब लोंढे, संजय दळवी, राजेंद्र काळे, वर्षा कासार, हेमाली नागापुरे, सोहनी पुरनाळे, प्रिती वाडेकर, अपर्णा आव्हाड पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांची कौतुक केले व शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले .