निंबळक -बोल्हेगाव भुयारी मार्गाचे काम सुरू
माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचा पाठपुरावा
अहमदनगर -निंबळक बायपास चौकातून जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्याच्या खालून निंबळक बोल्हेगाव रस्त्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. माजी जिल्हा परिषद माधवराव लामखडे यानी हा भुयारी मार्ग होण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ याना निवेदन देऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले. या भुयारी मार्गासाठी आ.संग्राम जगताप व आ. निलेश लंके यांचे हि सहकार्य लाभले.
अहमदनगर बाहयवळण रस्त्यावर निंबळक (ता. नगर ) येथील चौकात उड्डाण पुलाचे काम चालु आहे. या कामामुळे जिल्हा परिषद हद्दीतलील निंबळक ते बोल्हेगाव हा रस्ता कायम स्वरुपी बंद होणार आहे. या परिसरातील सुमारे १० ते १२ या गावातील शेतकरी कामगार व व्यावसायीक या रस्त्याचा वापर करतात. तसेच निंबळक ते बोल्हेगाव या रस्त्याच्या बाजुस सुमारे ५ ते ६ हजार लोकसंख्या असलेल्या वस्त्या आहेत. आपले विभागा अंतर्गत हा रस्ता बंद करुन जो पर्याय मार्ग सुचविला आहे तो अत्यंत चुकीचा व गैरसोयीचा आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व निंबळक ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर रस्ता बंद नकरता भुयारी मार्ग देण्यात यावा. या मुळे सर्व शेतकरी, दुग्ध व्यावसायीक, कामगार व समस्त ग्रामस्थ यांचा प्रश्न सुटेल. या बाबतचे निवेदन माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे
बाळासाहेब गायकवाड, लक्ष्मण होळकर, अशोक पवार, संपत घोलप, अशोक घोलप, प्रशांत गोडसे यांनी मा. प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला दिले होते. याची दखल घेत या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे या भुयारी मार्गामुळे रस्त्यावर होणारे अपघात टाळले जातील व नागरिकांची सोय होणार आहे.