पीएम श्री जिल्हा परिषद शाळा निंबळकची गुणवत्तेत भरारी
नगर तालुक्यातून निबंध स्पर्धेत गौरी उगले हिची प्रथम क्रमांकाने बाजी, इतर तीन मुलीही चमकल्या .
अहमदनगर:छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत नगर तालुक्यातून निंबळक शाळेची गौरी किरण उगले हिचा निबंध स्पर्धेत नगर तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असून अपेक्षा रविंद्र शिंदे (पाचवा) ,आर्शिया समीर पटेल (सहावा),स्वरांजली किरण आंग्रे (नववा) क्रमांक आल्याची माहिती निंबळक शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र कोल्हे यांनी दिली .
नगर तालुक्यातून प्रथम तीन व सात उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.यापूर्वीही सन २०२३- २४ या वर्षात वीरगाथा ३.० या देशपातळीवर झालेल्या स्पर्धेत कु.गौरी किरण उगले हिने निबंध स्पर्धेत १०० विजेत्यांमध्ये स्थान मिळवले होते. यासाठी कु गौरी हिचा नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.
या स्पर्धेसाठी निंबळक शाळेतील वर्गशिक्षिका अर्चना जाचक व सुनिता रणदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले .
शाळेच्या या विशेष यशाबद्दल नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव,विस्तारअधिकारी संजय बोबडे ,केंद्रप्रमुख संजय धामणे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार ,सरपंच प्रियंका लामखडे ,उपसरपंच बाळासाहेब कोतकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजुश्री कुलट,उपाध्यक्ष समीर पटेल ,घनशाम म्हस्के ,राणी पवार ,प्रिया घोलप ,शहाजी अवचर,वर्षा कोतकर,सविता कदम ,सुलोचना रोकडे,अशोक कळसे,रेणुका साठे ,छाया जाधव,प्रशांत जाजगे, बाबासाहेब पगारे,विकास सोसायटीचे चेअरमन भाऊराव गायकवाड ,व्हाईस चेअरमन विलास आळंदीकर व सर्व संचालक यांचेसह या शाळेतील सहशिक्षक राजेंद्र निमसे,प्रज्ञा हापसे,भागचंद सातपुते, सुनीता रणदिवे,सुजाता किंबहुणे ,रघुनाथ झावरे,सुखदेव पालवे,शैला सरोदे,प्रयागा मोहोळकर,दत्तात्रय जाधव,शरद जाधव,अर्चना जाचक,मनीषा नांगरे,विशाल कुलट,मुक्ता कोकणे आदींनी अभिनंदन केले आहे .