_जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा – प्रा. बी.एन.शिंदे_*
*संतुकनाथ विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी*
जेऊर (बा) – जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे महत्वाचे आहे, आत्मविश्वास असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, असे प्रा. शिंदे बी.एन. यांनी सांगितले. जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात आयोजित कर्मवीर जयंती समारंभाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदामराव तागड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. माणिकराव विधाते, सतीशशेठ थोरवे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका रोहिणी गाडेकर व विद्यार्थिनींनी स्वागत गीत व कर्मवीर गीताने केली. सुदामराव तागड यांनी विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी मोबाईल पासून दूर राहावे असे सांगितले तसेच अपयशयाला खचून न जाता जीवनामध्ये आपला मार्ग चांगल्या प्रकारे काढावा असे सांगितले. माणिकराव विधाते यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य गोविंदराव मोकाटे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी कटिबध्द आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन विद्यालयाच्या प्र.प्राचार्या रोहिणी भोर यांनी केले.पाहुण्याची ओळख व सत्कार उपशिक्षक सिताराम बोरुडे यांनी केला.तसेच संस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवींचे बक्षीसे व बायजा माता व्यापारी प्रतिष्ठान यांच्या बक्षिसांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसांचे वाचन बाबासाहेब माळशिखरे यांनी केले. बायजा माता व्यापारी प्रतिष्ठान व विद्यालयाच्या वतीने विजय चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.तसेच रमेश भांड यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आले .तसेच आदर्श विद्यार्थी वेदांत वाघमारे, रोहित शिंदे, आदर्श विद्यार्थिनी तन्वी खेत्री यांना सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आले.बायजा माता व्यापारी प्रतिष्ठान यांनी विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार देवून गौरव केले.तसेच विविध क्षेत्रातील माझी विद्यार्थी कृष्णा मोढवे (इंजिनियर) मगर किरण (विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड) तुषार पाटोळे (एस.आर.पी.एफ.पोलीस) ओमकार तोडमल (STI) यांचे व स्कॉलरशिप व एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी दर्शन बेलेकर ,सत्यम ससे तुषार शिंदे, ओम भांड ,ईश्वर मगर,कृष्णा काळे, प्रतीक्षा काळे राहुल तवले, राहुल ससे, श्रुती ससे तसेच संस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीच्या बक्षीसांमध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गायत्री चेमटे ,सुमेधा बनकर, तनुजा मंचरे, पल्लवी उमाप, श्वेता हारेल, ज्ञानेश्वरी दारकुंडे, साक्षी मोकाटे,गौरी मगर, पूजा तोडमल या सर्वांचे सत्कार करण्यात आले.तसेच शाळेला वेळोवेळी मदत करणारे आकाश ससे,बंडू तोडमल,रोहन बोरकर,बंडू जरे यांचे सत्कार करण्यात आले.शाळेसाठी हरिभाऊ हारेर यांनी साईबाबा यांची प्रतिमा प्रदान केली.
या कार्यक्रमासाठी नारायणदादा तोडमल,विजयकुमार मगर,मधुकर मगर, दत्तात्रय डोकडे, श्यामराव विधाते,अंबादास पवार,हरिभाऊ शेटे,रघुनाथ झिने,बापूसाहेब गायकवाड,विकास काळे,विवेक तोडमल,दिनेश बेल्हेकर, हसनाळे साहेब,किशोर शिकारे,श्रीधर तवले,आदिनाथ बनकर,गोरक्षनाथ मगर,अजय डोळसे,अशोक ससे,लहू कराळे,सुरेश गोरे,नामदेव गायकवाड, किसनराव मंचरे, रावसाहेब ससे, आसाराम वाघमोडे, रघुनाथ तोडमल, ज्योतीताई तोडमल, अर्चना मोकाटे, पूजा काळे, सुनिता मोढवे,श्वेता हारेर ,कल्याण ससे,संतोष काळे,बलभीम मोढवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती मगर, सुरेखा वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन युगंधरा पाडळे यांनी केलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची सांगता विद्यालयाच्या प्र.पर्यवेक्षिका वर्षा भोईटे यांनी पसायदानाने केली.