शेंडी येथील विदयार्थीना बसची व्यवस्था करा सरपंच प्रयागा लोंढे यांचे आगार प्रमुखाना निवेदन

निबंळक – शेंडी, (तालुका- नगर ) येथील मुले शिक्षणासाठी नगर मध्ये जात आहे. मात्र बसची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थीचे हाल होत आहे.तरी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बस सुरु करण्यात यावी याबाबतचे निवेदन सरपंच प्रयागा लोंढे व विद्यालयातील मुलींनी तारकपुर येथील आगार विभागाला दिले.
 शेंडी हे गाव नगर शहरानजीक आहे. गावातील मुली शाळेसाठी व कॉलेजसाठी मोठ्या प्रमाणात शहरात जा-ये करतात. सध्या गावातील ४५ ते ५० मुली कॉलेजमध्ये शिक्षण घेत असुन त्यांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र अशी कुठलीही व्यवस्था नाही.  शहरात कॉलेजला जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी गावातील मुलींना कॉलेजला जाण्या- येण्यासाठी आपल्या आगरामार्फत स्वतंत्र बस सुरु करण्यात यावी. सदरची बस सकाळी ९:३० ते ९:४५ वाजता गावामध्ये येईल अशा पद्धतीने व संध्याकाळी कॉलेज सुटणेच्या वेळेत ठीक ४:०० वाजता तारकपूर येथून शेंडी गावाकडे मुलींना येण्यासाठी हजर राहील अशा पद्धतीने बस सुरु करण्यात यावी याबाबतचे निवेदन सरपंच प्रयागा लोंढे यांनी आगार विभागाला दिले. यावेळी विदयार्थीनी उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *