सारोळा कासार येथे दिडशे माजी सौनिकांचा सन्मान
अहमदनगर -आजादी का अमृत मोहत्सव देशात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. मेरा देश मेरी मिट्टी अंतर्गत सारोळा कासार येथील दिडशे माजी सौनिकांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
सारोळा कासार ( ता. नगर ) येथे आज मेरा देश मेरी मिट्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच हातात मशाल व डोक्यावर कलश घेऊन गावात प्रभातभेरी काढण्यात आली. शहीद झालेल्या जवानाची वेशीजवळ कोनशीला बांधण्यात आली तिचे अनावरण यावेळी करण्यात आले. छत्रपति शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. सारोळा कासार परीसरातील माती हातात घेऊन तसेच हातात दिवा घेऊन पंचप्राण शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी सैनिक, वीरमाता , वीरपत्नी यांचा फेटा घालून व वृक्ष देऊन सरपंच आरती कडूस व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला. तसेच वीर माता व आजी माजी सौनीकांच्या हस्ते ७५ झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. . कार्यकमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस यांनी केले. आजी माजी सैनिक, सदस्य, कृषि सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, दत्तात्रय कडूस, तुकाराम ढोरे,आशाबाई कडूस, श्रीमती नगरे, योगिता लिंबोरे, विठ्ठल काळे, ग्रामसेविका जाधव, आसिफ शेख, संजय राहील, बब्बू इनामदार, यांनी नियोजन केले. याप्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका सर्व आरोग्य कर्मचारी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक ,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, वीज मंडळाचे अधिकारी, तलाठी कृषी अधिकारी सिध्दार्थ क्षीरसागर, बचत गटाच्या महिला, सारोळा कासार आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शहाजान तांबोळी, आभार रोहित काळे यांनी केले.