हर घर तिरंगा रॅलीतून शहिदांचे स्मरण – खा.डॉ. सुजय विखे पाटील

 हर घर तिरंगा रॅलीतून शहिदांचे स्मरण – खा.डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर –
भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, घेतलेली कठोर मेहनत एवढेच नाहीतर या लढ्यातील शहीदाचे बलीदान  या पिढीला स्मरण राहावे या करिता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस तरुण – तरुणींनी दाखविलेला उत्साह हा खरोखरीच कौतुकास्पद आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नवनवीन संकल्प करतील तेव्हा तरुण – तरुणींनी असेच सहकार्य करावे असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. 
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर “हर घर तिरंगा” अभियानाच्या माध्यमातून आज अहमदनगर शहरात  मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, अश्या घोषणा देण्यात आल्या.
     भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वंसंध्येला आयोजित या रॅलीच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विखे म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता १५ ऑगस्ट रोजी होत असून या अमृत कालखंडात देशाने केलेली प्रगती ही अवर्णीय अशीच असून  देशाचे नेते नरेंद्र मोदी हे आता विश्वाचे नेते झाले आहेत. महासत्ता असलेले राष्ट्र हे मोदी यांना पाठिंबा देत आहेत. देश आता आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.  येणाऱ्या कालखंडात भारतीय अर्थव्यवस्था ही तीन नंबरची होईल असा आशावाद या वेळी व्यक्त केला. 
या रॅलीची सुरुवात मार्केट कमिटी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करून झाली. माणिक चौक येथे स्वातंत्र सेनानी सेनापती बापट व कारंजा चौक येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन  करण्यात आले. 
न्यू आर्टस् कॉलेज येथे हुतात्मा करवीर चौथे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करुन बाईक रॅली ची सांगता करण्यात आली. या रॅलीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष  शिवाजी कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष  दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष  अभय आगरकर, माजी महापौर  बाबासाहेब वाकळे,  महेंद्र गंधे, अक्षय कर्डिले , सुरेंद्र गांधी,  धंनजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगरसेवक, भाजप पदाधिकारी, तरुण – तरुणी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *