रुईछत्तिशी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..
स्मशानभूमीसाठी जागा देणाऱ्या पाडळकर परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण..
रुईछत्तिशी – (देविदास गोरे )
रुईछत्तिशी( ता. नगर ) येथील स्मशानभूमीसाठी पाडळकर परिवारानी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात ह.भ.प सर्जेराव महाराज पाडळकर यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले , गावातील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून खितपत पडला होता.जागेअभावी सुसज्ज स्मशानभूमी बांधता येत नव्हती.पाडळकर परिवाराने हा प्रश्न जागा देऊन मार्गी लावला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे ध्वजारोहण आज पाडळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले.सामान्य नागरिकांनी देखील गावच्या विकासात योगदान दिले पाहिजे हा संदेश पाडळकर परिवाराच्या वतीने देण्यात आला.यावेळी सुभाष पाडळकर , राजेंद्र पाडळकर व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य यांना ग्रामपंचायतच्या वतीने सप्रेम भेट म्हणून पोशाख देण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन , संचालक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मतदनीस, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, माता – भगिनी, ग्रामस्थ उपस्थित होते.