दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..

 दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..
शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करुन जोपासली सामाजिक बांधिलकी

रुईछत्तिशी  – ( देविदास गोरे )

नगर तालुक्यातील दहीगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.गावातील तरुण वर्गानी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीराम विद्यालय यांना एकत्रित रित्या टिफीन बॅग , पाणी बॉटल , डबा अशा वस्तू देण्यात आल्या

.सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने ०१ ली ते १० वी वर्गातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना जनसेवा परिवर्तन विकास मंडळाच्या वतीने तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना रामवाडी तरुण मंडळाच्या वतीने साहित्य वाटप करुन अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
                  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी देशात विविध कार्यक्रम राबवले जात असताना ग्रामीण भागात देखील स्वातंत्र्याच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.शालेय व विद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.जनसेवा परिवर्तन विकास मंडळ व रामवाडी तरुण मंडळाचे या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.या अनोख्या कार्यक्रमाच्या वेळी जयवंत पाटील शिंदे , सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ.सर्जेराव म्हस्के , जनसेवा परिवर्तन विकास मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच सुनील म्हस्के , रामवाडी तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल म्हस्के , ॲड.वाघ , विनायक वाघ , प्रतीक जरे ,तात्यासाहेब म्हस्के , दादाभाऊ हिंगे , गणेश हिंगे , जावेद शेख , गोरख पाटील , राहुल पोटरे , राजाराम हंबर्डे तसेच गावातील इतर ग्रामस्थ , पदाधिकारी , मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *