डॉ. सुनिल गंधे प्राईड ऑफ इंडिया पुरस्काने सन्मानित

 डॉ. सुनिल गंधे  प्राईड ऑफ इंडिया पुरस्काने सन्मानित

अहमदनगर -कोव्हीड काळात केलेल्या  सामाजीक कार्याबद्दल जखणगांवचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांना
पुणे येथील विश्वव्यापी काम करणाऱ्या ग्रीन वर्ल्ड ग्रुप व  कॉसमॉस बँक पुणे यांच्या वतीने प्राईड ऑफ इंडिया हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार १४ ऑगस्ट रोजी
पुणे येथील मुक्तांगण सभागृहात देण्यात आला. 
 पुणे येथील विश्वव्यापी काम करणाऱ्या ग्रीन वर्ल्ड ग्रुप व  कॉसमॉस बँक पुणे यांच्या  वतीने दरवर्षी पुरस्काराचे नियोजन करण्यात येते. प्राईड ऑफ पुणे इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार राज़्य उत्पादन शुल्क आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते व कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, हेमंत राठी,र अमोल रावेतकर,पुणे जिल्हा न्यायाधीश सुहास दबडगांवकर, संजय कणेकर,सुनिल चंदेरे व ग्रीनवर्ल्ड इंटरनॅशनल ग्रुपचे गौतम कोतवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला..
कोव्हीड काळात केलेली रूग्ण सेवा, मा.शरदचंद्र पवार  आरोग्य मंदिर भाळवणी येथे सलग सहा महीने २४तास सुमारे ३०००० रुग्णांवर केलेले यशस्वी उपचार.अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील जंतरमंतर आंदोलनात नोंदला गेलेला सक्रिय सहभाग.भ्रष्टाचार विरोधी चळवळीत गेली २५ वर्ष करत असलेले प्रयत्न तसेच ३५ वर्षांपासून सर्वच क्षेत्रात करत असलेल्या निस्वार्थ सेवेसाठी  निवड समीतीने त्यांची दखल घेत पुरस्कारासाठी निवड केली आहे या आधीही विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे शेकडो पुरस्कार मिळाले आहेत.
आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु कोव्हीड काळात केलेले काम व अण्णांच्या सोबत चळवळीत केलेल्या राष्ट्रनिर्माण कार्याबद्दल मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी महत्वाचा आहे.  या पुढेही ग्राम विकास कार्य आरोग्य ग्राम जखणगांव निर्मितीच्या दृष्टीने करणार असल्याचे  डाँ.सुनील गंधे यांनी सांगितले.
डाँ. गंधे  यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या  वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *