कृष्णा मोहन मैड यांचे आकस्मिक निधन…
कन्या प्रतीक्षा मैड हिने दिला अग्निडाग…
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील वाटेफळ येथील रहिवाशी कृष्णा उर्फ बाळू मोहन मैड यांचे आकस्मिक निधन झाले. वाटेफळ या गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे त्यांची कन्या प्रतीक्षा मैड या २५ वर्षीय उच्च शिक्षित मुलीने त्यांना अग्निडाग देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. समाजात अग्निडाग देण्यासाठी मुलाकडे वंशाचा दिवा म्हणून पाहिले जाते पण प्रतीक्षा हिने आपल्या वडिलांना अग्निडाग , मुखाग्नी देऊन वंशासाठी पणती हवी असते हे दाखवून दिले आहे.एखाद्या परिवारात मुलगा नसल्याने पुतण्या किंवा भाऊ यांनी अग्निडाग देण्याच्या घटना समोर येतात पण मुलीने अग्निडाग देऊन समाजात नवा पायंडा रचला आहे.जुन्या चालीरीती , जुन्या परंपरा यांचा विचार न करता समाजाने नवीन वळणावर चालणे गरजेचे आहे हे दाखवून दिले आहे.
कृष्णा मैड अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत ग्रंथपाल पदावर नोकरी करत होते.नोकरीच्या माध्यमातून त्यांनी मित्र परिवार उभा केला होता.समाजात त्यांच्याप्रती लोकांची भावना स्वच्छ व निर्मळ होती. कृष्णा मैड यांच्या जाण्याने मैड परिवार व वाटेफळ गावात आणि त्यांचे नातेवाईक , स्नेही , मित्र परिवार यांच्यात शुकशुकाट पसरला होता.अतिशय दुःखदायक वातावरणात त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलीने दिलेला अग्निडाग पंचक्रोशीत आणि संपूर्ण तालुक्यात भूषणावह व आदर्शवत ठरला आहे.