निंबळक जिल्हा परीषद गटातून संजय गारुडकर यांनी उमेदवारी करावी नागरिकांची जोरदार मागणी

निंबळक जिल्हा परीषद गटातून संजय गारुडकर यांनी उमेदवारी करावी नागरिकांची जोरदार मागणी

माजी कृषिमंत्री शरद पवार तसेच खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले संजय गारुडकर सर यांना आगामी निवडणुकीत निंबळक गटातून उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. गारुडकर सरांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमधून गटातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

ग्रामविकास, शेतकरी प्रश्न सोडवणे, तसेच तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार उल्लेखनीय राहिल्याचे नागरिकांचे मत आहे. गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि तळमळीचे नेतृत्व आवश्यक असून हे नेतृत्व गारुडकर सर उत्तमरित्या निभावू शकतील, असा स्थानिकांचा विश्वास आहे.

यामुळे निंबळक गटात त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत त्यांना संधी द्यावी, अशी मागणी अधिक जोम धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *