जखणगांव येथे उच्चशिक्षित व कार्यक्षम महिलांच्या हस्ते झेंडावंदन
अहमदनगर -नगर तालुक्यातील जखणगांव येथे
स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील विविध ठिकाणी सार्वत्रिक झेंडावंदन गावातील सर्वात उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष महिलांच्या हस्ते करण्यात आले.
जखणगाव नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जगभर ज्ञात आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या गावात तीन दिवस साजरा करण्यात आला.
सहकारी बँक परिसरातील झेंडावंदन कम्प्युटर मध्यें पदव्युत्तर पदवी प्राप्त करून बँकेत अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अंकिता बाळासाहेब कर्डिले व एमबीबीएस,डीसीएच पर्यंत शिक्षण घेऊन सध्या भारत सरकार च्या लस व ऊपचार संशोधन केंद्र पुणे येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डाँ. संयोगिता सुयश गंधे यांचे हस्ते , प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण शास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन आँनलाईन पद्धतीने घरून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या स्वाती राकेश वाबळे व वाल्मिक या आदिवासी समाजातील असुन सुद्धा १९७० मध्ये ७वी पर्यंत शिक्षण घेऊन गावात बचत गटाचे माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य करणाऱ्या कुसुम आबासाहेब गुंजाळ यांचे हस्ते तर ग्रामसंसद कार्यालय येथील झेंडावंदन कार्यक्रम प्राध्यापिका सुनिता सुनिल कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर शाळेतील मुलामुलींनी योगा हा कार्यक्रम सादर करून उपस्थिताना मन्त्रमुग्ध केले. सरपंच डॉ. सुनिल गंधे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.शासन निर्देशानुसार ग्रामविकासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.या कार्यक्रमाला सरपंच डॉ. सुनील गंधे ,चेअरमन बाळासाहेब कर्डिले, उपसरपंच शाबिया शेख,डॉ रूषाली झावरे,बाळासाहेब शहाणे, बबनराव कर्डिले, रोहन हाडोळे,तात्या कर्डिले, गणेश काळे, सुनिल धिरवडे,नवनाथ वाळके, प्रगती कर्डीले, सुनिता चाबुकस्वार, रमेश आंग्रे,फिरोज शेख,सुर्यभान भीसे यांचेसह असंख्य ग्रामस्थ,कर्मचारी, विद्यार्थी व अधिकारी उपस्थित होते

