डॉजबॉल स्पर्धेत देहरे, रुई छत्तीसी, गुंडेगाव संघ विभागीय पातळीवर
निंबळक – : जिल्हा स्तरीय डॉजबॉल स्पर्धेत नवभारत विद्यालय देहरे ,रुईछत्तीसी येथील मातोश्री भागुबाई भांबरे ज्यु. कॉलेज,गुंडेगावच्या समर्थ जुनिअर कॉलेज
समर्थ जुनिअर कॉलेज गुंडेगाव विद्यालयाची विभागीय पातळीवर निवड झाली.
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे सोमवारी (दि. २३) देहरे (ता. नगर ) येथील नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण १५ संघानी सहभाग नोंदवला. यामध्ये देहरे येथील नवभारत विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजेता ठरला असून त्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तर आत्मामलिक पब्लिक स्कुल कोकमठाण शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
१७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात रुईछत्तीसी येथील मातोश्री भागुबाई भांबरे ज्यु. कॉलेजने प्रथम क्रमांक पटकवला. तर आत्मा मलिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय कोकमठाण ने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. १९ वर्षीय मुलांच्या संघात गुंडेगावच्या समर्थ जुनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला तर भिंगरच्या प्रियंदर्शिनी पब्लिक स्कुलने द्वितीय क्रमांक पटकवाला.
१९ वर्ष मुलींच्या संघात समर्थ जुनिअर कॉलेज गुंडेगाव प्रथम तर नवभारत विद्यालय देहरेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक चंद्रकांत सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व यशस्वी
खेळाडू मुलां मुलींचे जिल्हा मराठा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिपकराव दरे, प्राचार्य शिरीष टेकाडे, पर्यवेक्षक कैलास मोकळे यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे देहरे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.