स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..

 गुंडेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..

मेरी मिट्टी,मेरा देश अभियानाची गावातून प्रभात फेरी..
तालुका प्रतिनिधी – मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत गुंडेगाव येथे आजी माजी सैनिकांचा सन्मान भारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण होत आहेत.गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे. याचेच प्रतिक म्हणून आजी – माजी सैनिकांचा सन्मान करुन देशाचा अभिमान जपला जात आहे.गुंडेगाव येथे देखील मेरी मिट्टी ,मेरा देश अभियान अंतर्गत आजी – माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. देशसेवा करत असताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली देण्यात आली  व वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी फरजाना फिरोज शेख यांचा ही सन्मान करण्यात आला.यावेळी तरुणांनी देशासाठी योगदान दिले पाहिजे.भारत मातेची सुरक्षा जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे हाच संदेश देण्यात आला.भारत मातेच्या रक्षणासाठी प्रत्येक श्वास , प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.तरुणांना देशासाठी प्रेरित होता आलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला. आजी सैनिक , त्यांचे पालक, माजी सैनिक यांना गुलाबपुष्प शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
                गावातून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय गुंडेगाव यांनी प्रभात फेरी काढण्यात आली होती.यावेळी देशभक्ती गीते गाऊन देशाच्या क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली.
     ग्रामपंचायत,विविध सेवा सोसायटी, इतर खाजगी संस्था यांनी पुढाकार घेऊन देशसैनिकांप्रती अभिमान ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले.गावात प्रत्येक नागरिकांनी अमृत महोत्सवी हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी प्रयत्न केले आहे.यावेळी ध्वजारोहण करण्यासाठी सर्व गावातील नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित होते.सैनिकांच्या सन्मान प्रसंगी गावचे सरपंच सौ.मंगल सकट, उपसरपंच संतोष कोतकर, पृथ्वी अॅग्रोचे संचालक छबुराव हराळ, रंगनाथ तात्या भापकर,उद्योजक शंकर भापकर, उद्योजक संजय भापकर, विलासराव कोतकर,त्रिदल माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शामराव कासार, भवानी प्रसाद चुंबळकर, सतिश हराळ, नारायण भापकर, कारभारी आगळे, छबुराव येठेकर, अब्बास शेख, संतोष जाधव,किरण भापकर,राहुल चौधरी, उद्योजक दिपक भापकर, सुनिल भापकर, शिवनाथ कोतकर,संदिप भापकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक प्रविण डावखरे, न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय मुख्याध्यापक परशुराम साबळे, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य सुनिल इंगळे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी,ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक , ग्रामस्थ ,तरुण मंडळी उपस्थित होते…
*चौकट..*
शासनाने बेटी बचाव बेटी पढाओ चे राष्ट्रीय अभियान राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.या उद्देशाने गुंडेगाव तृप्ती चौधरी तसेच देशाचा स्वातंत्र्यदिन, देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने शाळेतील मुलींना भविष्यात शिक्षणाची अडचण येऊ नये तसेच गुणवंत विद्यार्थीनी घडाव्यात यासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे म्हणून मी आज शाळेत “बेटी बचाव बेटी पढाओ” उपक्रमासाठी पाच हजार रुपयांची देणगी देत आहे.
*- अशोक जगदाळे (गुंडेगाव ग्रामविकास अधिकारी)*
*चौकट..*
आज प्रत्येकाने देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक व देश सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी दिला पाहिजे.तसेच आज देवालये मोठ मोठी बांधली जात आहेत. जर गावा गावातील ज्ञान मंदिरे मोठ मोठी बांधले पाहिजेत जेणेकरून भविष्यात नक्कीच यातून सैनिक,अधिकारी,शिक्षक, डॉक्टर, शास्त्रज्ञ घडून देशाची प्रगती होईल व देश खऱ्या अर्थाने सारे जहाँ से अच्छा व महान होईल असे मला वाटते.
– संतोष भापकर (उपसरपंच गुंडेगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *