तांदळी वडगाव येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा..
०२ सप्टेंबर रोजी धर्मनाथाचा भव्य यात्रोत्सव…
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची आजपासून सुरुवात होत आहे. तांदळी वडगांव येथे धर्मनाथाचे खूप प्राचीन मंदीर आहे.नगर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा तांदळी येथे भरते. आजपासून येथे हरिनाम सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा सुरु होत आहे.महंत शंकर महराज भारती यांच्या हस्ते सप्ताहात प्रारंभ होणार आहे.प्रवचन , गाथा भजन , हरिपाठ , काकडा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प रामदास महाराज रक्टाटे , ह.भ.प ज्ञानेश्र्वर माऊली सुडके , ह.भ.प बबन महाराज बहिरवाल , ह.भ.प दयानंद महाराज कोरेगावकर , ह.भ.प लक्ष्मण महाराज शास्त्री , ह.भ.प विकासानंद महाराज मिसाळ , ह.भ.प जयसिंग महाराज इथापे यांची किर्तने होणार असून ह.भ.प साध्वी सोनाली दिदी करपे , चकलंबा ता. गेवराई यांच्या काल्याच्या किर्तनाचे सप्ताहाची सांगता होणार आहे.०२ सप्टेंबर रोजी धर्मनाथाची यात्रा भरणार असून सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नामवंत किर्तनकारांची कीर्तने होणार असल्याने सप्ताहात पंचक्रोशीतून मोठे भाविक भक्त सप्ताहास उपस्थित राहणार आहेत. गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामस्थ , पदाधिकारी , तरुण बांधव , भजनी मंडळ , देवस्थान समितीने सप्ताहाचे अतिशय पारदर्शी नियोजन केले आहे.