सप्टेंबरही कोरडाच ! खरोखर निनोचा परिणाम , राज्यावर दुष्काळाचे सावट येण्याची चिन्हे…
रुईछत्तिशी – सप्टेंबर महिना देखील कोरडा जाण्याची भिती निर्माण झाली आहे. निनोचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.०७ सप्टेंबर नंतर विदर्भ व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस जास्त परिणामकारक नसणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.एकीकडे हिमालयात पावसाने हाहाकार घातला असून दक्षिण भारतातील खरिपाची पिके पावसाअभावी जळून चालली आहेत. अल निनो जास्त परिणाम करण्याची शक्यता असल्याने सप्टेंबर महिना देखील कोरडा जाणार आहे. शेतकऱ्यांची अवस्था जास्त हवालदिल होणार आहे. ऑगस्ट मध्ये निरास करणारा आयओडी सप्टेंबर मध्ये साथ देईल का ! अशी भिती निर्माण झाली आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो त्यामुळे हंगामी शेती बागायती होते त्याच धर्तीवर येथे शेतकऱ्यांची अनेक पिके साचलेल्या पाण्यावर तग धरुन राहतात.सध्या अशी कोणतीच अवस्था नसल्याने राज्यात भयंकर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात जर दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांचे आणि जनावरांचे पूर्णपणे जनजीवन विस्कळित होऊन जाईल. शेतकरी कर्जबाजारी होऊन पुन्हा आत्महत्या वाढल्याशिवय राहणार नाहीत.