के.के. रेंज च्या विस्तारासाठी सपांदित क्षेत्र वगळण्यासाठी सरक्षणंमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन

 के.के. रेंज च्या विस्तारासाठी सपांदित क्षेत्र वगळण्यासाठी सरक्षणंमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन

खासदार डॉ. सुजय विखे, पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिले निवेदन
नगर ब्रेकींग न्यूज-. अहमदनगर जिल्हयातील के के. रेंजच्या विस्तारासाठी संपादित क्षेत्रातून निर्बंध हटवणे बाबतचे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे, पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले

 के.के.रेंज युद्ध सराई क्षेत्रांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नगर,पारनेर आणि राहुरी तालुक्यांतर्गत २३ गावांतील १०७९८ हेक्टर शेतजमीन आणि वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल जाणून घेण्याची आपणास विनंती आहे. . त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बँकाही त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, शेतमालाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, त्या शेतकऱ्यांना स्वतःची शेती असूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या २३ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, या संपादित जमिनीवरील सर्व निर्बंध हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अहमदनगर जिल्ह्याला सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मुळाधरणाचाही या भागात समावेश आहे. युद्धाच्या सरावामुळे या धरणाच्या सुरक्षततेला बाधा येऊ शकते. ही सर्व कारणे लक्षात घेऊन या भागातील निर्बंध हटवावेत ही नम्र विनंती.आपण या विनंतीचा गांभीर्याने विचार करून सर्व बाधित गावकरी व शेतकऱ्यांना मदत कराल अशी आशा आहे.
चौकट
देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंह यांनी आज लोणी येथील कार्यक्रमात के.के. रेंज संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेऊ. व शेतकऱ्या क्य अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले 
या गावाचा समावेश
देहेरे,इस्लामपुर,शिंगवे,नांदगाव,सुजलपुर,घाणेगाव,
बाभुळगाव,जांबुभबन,जांभळी,वरवंडी,बारागाव नांदुर कुरणवाडी,घोरपडवाडी,चिंचाळे,गाडकवाडी,तहाराबाद,दरडगावथडी,वावरथ,
पळशी,वडगाव,सावताळ, गाजीपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *