युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा *राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे* यांना प्रदान करण्यात आला..🙏🙏
सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय २०२४ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, मेडल देऊन नुकताच प्रदान करण्यात आला आहे..
व्यावसायिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
वकील बंधू भगिनींच्या अडचणींसाठी आणि प्रश्नांसाठी ॲड. संदीप पाखरे हे सतत कार्यरत असतात..
ॲड. संदीप दादासाहेब पाखरे हे अहमदनगर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. ॲड. पाखरे हे नोटरी पब्लिक भारत सरकार असून अहमदनगर लॉयर्स ऑप सोसायटीचे संचालक देखील आहेत..
वकील बंधू भगिनींच्या अडचणींसाठी आणि प्रश्नांसाठी ॲड. संदीप पाखरे हे सतत कार्यरत असतात..
वकिली व्यवसायात समवेत ॲड. पाखरे हे सामाजिक कार्यात देखील अग्रभागी असतात कोविड-१९ च्या आपत्ती जनक परिस्थितीत अनेक गरजू व्यक्ती आणि रुग्णांना ॲड. संदीप पाखरे यांनी ब्लड प्लाज्मा हॉस्पिटल जेवण इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणावर निस्वार्थीपणे मदत केलेली होती. अंध अपंग निराधार वृद्ध व्यक्तींकरिता ॲड. पाखरे निस्वार्थीपणे नेहमीच मदत करतात..
त्यांच्या निस्वार्थीपणे करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांनी सन २०२४ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे यांना जाहीर करून प्रदान केलेला आहे..
ॲड. संदीप दादासाहेब पाखरे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय सामाजिक धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातील विविध नामांकित व्यक्तींनी आणि जिल्हा न्यायालयातील वकील बंधू भगिनींनी ॲड. संदीप पाखरे यांचे जल्लोषात अभिनंदन केले आहे.