के.के.रेंज प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये , एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही – महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील..
देविदास गोरे.
अहमदनगर – नगर , राहुरी , पाथर्डी तालुक्यातील जवळपास १७ हजार हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या के.के. रेंज या संरक्षण प्रकल्पासाठी देण्याचे अनेक वर्षापासून निश्चित झाले आहे परंतु या तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत कोणतीही चिंता करू नये , शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री यांची आपण भेट घेऊन समस्या सोडविणार आहोत , लोणी प्रवरा येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येणार आहेत त्यांना संपूर्ण जिल्हयाचे शिष्टमंडळ भेटून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन राज्याचे महसूल , दुग्धविकास व जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.राहुरी येथील विविध शहर विकासाच्या कामांचा शुभारंभ विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.नगर , पारनेर , राहुरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वेळा दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि अशातच जर शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतील तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही यावर बोलताना विखे पाटील यांनी अभ्यासू भूमिका मांडली , यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले , खासदार डॉ.सुजय विखे पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील , जिल्हाप्रमुख दिलीप भालसिंग , कारखान्याचे माजी चेअ रमन नामदेवराव ढाकणे व इतर पदाधिकारी , मान्यवर उपस्थित होते.