सभासदांच्या ठेवी लुटण्याचा सत्ताधारी गुरुमाऊलीचा डाव…
सभाससदांना न्याय देण्याची भूमिका – शिक्षक समितीचे नेते संजय धामणे..
रुईछत्तिशी – ( देविदास गोरे )
अहमदनगर जिल्हा प्राथमिक बँकेच्या सभासदांच्या पैशावर नजर ठेऊन सत्ताधारी गुरुमाऊली निर्णय घेत असल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे.विकास मंडळ नावाच्या संस्थेकडे बँकेच्या सभासदांचे प्रत्येकी २० हजार रुपये वर्ग करण्याचा डाव सत्ताधारी गटाने आखला आहे. यापूर्वी देखील याच विकास मंडळाकडे सभासदांची ईच्छा नसताना एकाधिकार पद्धतीने प्रत्येकी १० हजार रुपये वर्ग करण्याचा डाव सत्ताधारी गटाने केला होता. सर्व सभासद शिक्षक वेळीच जागृत झाल्याने हा डाव हाणून पाडण्यात आला. या सर्व गोष्टी सत्ताधारी मंडळ हुकूमशाही पद्धतीने करत आहे. बँकेचे प्रशासन चालवण्यासाठी संचालक मंडळ असते.सभासदांच्या पैशावर यांचा कोणताही अधिकार नाही असे जाहीर मत बँकेचे माजी चेअरमन , शिक्षक समितीचे नेते संजय धामणे यांनी केले आहे.
निवेदन देताना संजय धामणे , दत्ता जाधव , सीताराम सावंत , अनिल आंधळे तर निवेदनावर माणिक जगताप , किरण दहातोंडे , संतोष भोपे , दत्तात्रय जाधव , विजय महामुनी , मिलिंद पोटे , रावसाहेब दरेकर , सुनील लोंढे , प्रल्हाद साळुंके , दत्ता गरुड , विजय जाधव ,दादा अकोलकर , संजय कुलकर्णी , अशोक घालमे , अशोक लोहरे , बाळासाहेब लहामटे , जना पवार , अण्णा आंधळे , सुभाष धामणे , एकनाथ आव्हाड , ऋषी गोरे , घोगरे , संतोष डमाळे , विजय कांडेकर , सुनील धाडगे , पांडुरंग पटारे , भाऊ रसाळ , राजन ढोले , जयप्रकाश साठे , बिभीषण हराळ , संदीप झरेकर , उस्मान तांबोळी , सुखदेव मोहिते , दादा चोभे , बाळासाहेब काशीद , इमान सय्यद , दस्तगीर शेख , दत्ता पानसरे , गणेश कुलांगे , बबन बनकर , अश्पाक शेख , जालिंदर खाकाळ , रमजान शेख आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत..