कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे;

 कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे;

– प्राचार्य विजयकुमार पोकळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधील विद्यालयाच्या माजी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार
अहमदनगर : अविरत अभ्यास, कठोर परिश्रम, योग्य नियोजन व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी केले.
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा, गट-अ तालुका कृषी अधिकारी या परीक्षेमधील विद्यालयाच्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार रेसीडेन्सीअल विदयालयात काल दि.२८ रत्री पार पडला या समारंभाप्रसंगी  ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उद्योजक दिपक लांडगे, बाळासाहेब काकडे, उपप्राचार्य प्रा. कैलास गोरे,  प्रा. सौ. वैशाली दारकुंडे उपस्थिती होते.
यावेळी पोकळे म्हणाले विद्यालय भौतिक सुविधांनी परिपूर्ण तर आहेच, पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व सर्वांगिण विकासावर विशेष लक्ष देत आहे.  रेसिडेन्शिअल आणि गुणवत्ता हे एक समिकरणच बनले आहे. 
तालुका कृषी अधिकारी म्हणून उत्तिर्ण झालेल्या  अभिषेक लगड,  सोनाली काकडे, ऋषिकेश भवर यांचा याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
यावेळी अभिषेक लगड व  सोनाली काकडे या दोघांनीही आपल्या यशाचा पाया रेसिडेन्शिअल ज्यू. कॉलेज मध्येच घातला गेला असे नमुद केले. परीक्षा उत्तीर्ण व्हायचे असेल तर आपल्या डोळ्यासमोर एकच धेय्य असले पाहिजे. प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेची स्वरूप लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. हेच या परीक्षेतील यशाचे सूत्र आहे, असे अभिषेक लगड याने सांगितले. दिपक लांडगे यांनी शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या वृत्ती मध्ये असणाऱ्या विषमतेवर भाष्य केले. कॉलेज मधील आयुष्य म्हणजे मौजमजा असा अर्थ घेणाऱ्या विदयार्थ्यांना नोकरी साठीचा साधा अर्ज देखिल लिहीता येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशाया परिस्थितीत रेसिडेन्शिअल विद्यालय मात्र आपल्या शिस्तीसाठी व गुणवत्तेसाठी आजही ओळखले जाते, हे विद्यालय म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना घडविणारे गुरूकुल आहे .असे गौरवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले. बाळासाहेब काकडे यांनी यावेळी बोलतांना पालकांनी मुलांवर अपेक्षेचे ओझे लादू नये असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र देवढे  तर आभार प्रा. अर्चना म्हस्के यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *