सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीर

सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीर
नगर / प्रतिनिधी

सव्वा वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्यात भरीव विकासकामे राबवून लोकजीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या सभापती सौ. सुरेखा गुंड यांची लोकमत जनसेवक अॅवार्ड’ साठी निवड करण्यात आली आहे. लोकमत समूहाने जनआधार, विकासकामांची गती, पारदर्शक कारभार आणि जनसंपर्कातील सक्रियता यांचा सर्वंकष आढावा घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे.

सभापती झाल्यानंतर सुरेखा गुंड यांनी ग्रामीण पातळीवर पाणीपुरवठा, रस्ते-विकास, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, आरोग्य सुविधा, अंगणवाडी सुधारणा, पंचायत स्तरावर पारदर्शक निधी-वाटप अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषत: जनसंपर्काचा वेग, ग्रामपातळीवर थेट भेटी, त्वरित अडचणी सोडवण्याची कृती या गुणांमुळे त्यांना सर्वस्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार असून त्या वेळी जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निवडीमुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

चौकट

लोकमत जनसेवक पुरस्कार मा. सभापती पंचायत समिती सौ सुरेखा संदिप गुंड यांना नगर तालुक्यात सव्वा वर्षाच्या कार्य काळात उत्कृष्ठ काम केले म्हणून काल दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाने जाहीर केलेल्या “लोकमत जनसेवक पुरस्कार,” मला दिल्याबद्दल मी लोकमत समूहाची आभारी आहे* .
हा पुरस्कार, मी आई वडील सर्व कुटुंबीय व आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, प्रा.शशीकांत गाडे सर आणि आजवर मला ज्यांनी आमच्या मागे खंबिर पणे साथ दिली असे सर्व मार्गदर्शक व्यक्तींना आणि सर्वात महत्वाचे ज्या जनतेने माझ्यावर मनापासून प्रेम केले अशा सर्वांना समर्पित करत आहे.

मा सभापती
सौ सुरेखा संदिप गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *