ओसाड माळरानावर जनावरांची भटकंती..

 ओसाड माळरानावर जनावरांची भटकंती..
गुराख्यासह शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे..

देवीदास गोरे.

रुईछत्तिशी – पाऊस सध्या लांबणीवर गेल्याने रुईछत्तिशी परिसरात व शुढळेश्वर डोगर रांगा ओसाड पडल्या आहेत.नगर तालुक्यातील सह्याद्रीची बाळेश्वर उपरांगेचा एक फाटा गुंडेगाव गावातून श्रीगोंदा तालुक्याकडे जातो या रांगेत अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी सोडतात.सध्या पाऊस लांबणीवर गेल्याने गुराख्यांचे देखील आकाशाकडे डोळे लागले आहेत.नगर तालुक्यासह अहमदनगर दक्षिण जिल्हयात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.खरिप पिके पूर्णपणे उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत.तीन चार वर्ष मिळून या भागातील शेतकऱ्यांना मोठया दुष्काळाचा सामना करावा लागतो.दूध व्यवसाय देखील अडचणीत आल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाऊस नसल्याने माळराने ओसाड पडली आहेत. भाद्रपदी उन्हाचा चटका आत्ताच जाणवू लागला आहे त्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत.तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनावरे माळरानावर मोकाट फिरत आहे त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही.
                शेळीपालन या भागात मोठया प्रमाणावर केले जाते.पाऊस पडला आणि माळरानावर गवत आले तर फिरत्या जनावरांची भूक भागते.गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे.विहिरी , कूपनलिका यांनी तळ गाठला आहे.झाडे झुडपे सुकून चालली आहेत.हिरवागार निसर्ग पिवळसर दिसू लागला आहे. माळरानावर जनावरांचा उदरनिर्वाह पूर्ण होत नसल्याने जनावरे सैरावैरा भटकत आहेत.दूध धंद्यावर चालणारा शेतकऱ्यांचा संसार कोसळून जाण्याच्या मार्गावर आहे.शेतकरी , गुराखी यांची दयनीय अवस्था होऊन बसली आहे.कोणत्याही प्रकारची सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.मागील चार वर्षापूर्वी देखील या भागातील जनता दुष्काळाने पूर्णपणे होरपळून निघाली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *