भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बँको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त

 भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बॅको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त

नगर ब्रेकींग न्यूज – अहमदनगर शहारातील उपनगरामधील भिंगार अर्बन बँकेला २०२३ चा बँको ब्लु रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार ऑक्टोबर महिन्यात दमण येथे दिला जाणार आहे अशी माहीती बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी दिली.
भिंगार अर्बन बॅक गेल्या ११५ वर्षापासून समाजभिमूख कामकाज करत आहे.आधुनिकतेची कास धरून सातत्याने प्रगती पथावर असलेल्या  या बँकेने  सन 2023  या आर्थिक वार्षिक वर्षात 275 ते 300 कोटी या दरम्यान ठेवी असलेल्या  सहकारी बँकामधून सन२०२३ चा बँको ब्लू रिबन पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
नव्या युगाच्या आव्हानाशी सामना करीत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत आव्हानांशी संघर्ष करीत बँकेने सहकारी चळवळील बळकटी दिली आहे. सहकारातून समृद्धीच्या समान न्यायाने सहकाराच्या तत्त्वाचे पालन केले आहे .यावर्षी एन.पी .ए चे प्रमाण झिरो टक्के आहे.  बँकेने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा पुरस्कारही बँकेला प्रदान केलेला आहे. तसेच बँकेला कै. वसंत दादा पाटील हा मानाचा पुरस्कार तीन वेळा मिळालेला आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन चे व महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांनीही पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. सहकार क्षेत्रामध्ये होत असलेले बदल व आव्हाने स्वीकारून आधुनिकतेची कास धरून बँकेने आपल्या खातेदारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहेत असे बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *