जीवनात नम्र भाव ठेवल्याने भगवंताची प्राप्ती होते , मानवता , उदारता , लीनता हीच खरी भक्ती – ह.भ.प बाळासाहेब महाराज रंजाळे..*
*गोपाळकाला चौथ्या दिवसाचे पुष्प…*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – जीवनात नम्र भाव ठेवल्याने भगवंताची प्राप्ती होते तर मानवता , उदारता , लीनता हीच खरी भक्ती आहे असे विवेचन हभप बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी केले , किर्तन चांग , किर्तन चांग ! होय अंग हरिरुप ! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे त्यांनी सुंदर निरुपण केले.संत ज्ञानेश्वर माऊली , शिवाजी महाराज यांनी जिवनात मोठा त्याग करून मानवतेचा संदेश दिला.नम्र राहील्याने प्रेम भाव निर्माण होतो आणि तीच खरी भक्ती असे सांगून भक्ती करण्याचा संदेश दिला.आपल्या स्वरभास्कर आवाजाने भक्तांची मने त्यांनी जिंकली.गावातील महादेव मंदिर पुरातन असून इच्छाशक्ती पूर्ण होते असे त्यांनी खाजगीत सांगितले.तरुणांनी धार्मिक कार्यात योगदान दिले पाहिजे.गावातील सर्व भजनी मंडळ , गायक , मृदुंगाचार्य , टाळकरी यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
महाराजांच्या गायनाने वातावरण पूर्ण मोहून गेले होते.गावातील भक्तीमय वातावरण महाराजांनी आवर्जून सांगितले.महाप्रसाद , तरुणांचे सहकार्य , पारंपरिक सप्ताहाचे नियोजन अतिशय पारदर्शी असल्याने आदर्शवत आहे असा अभिप्राय देण्यात आला.गेल्या चार दिवसांपासून गावातील वातावरण धार्मिक झाले आहे.गावं मोठे असल्याने अन्नदानाचे नियोजन कौतुकास्पद आहे.११ सप्टेंबर रोजी काल्याचे किर्तन असून ह.भ.प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.