व्हॉलीबॉल स्पधेंत हिंगणगाव,,टाकळी खातगाव शाळेची जिल्हा पातळीवर निवड
तर वर्का स्कूल, वाळकी, सोनेवाडी उपविजयी
नगर ब्रेकींग न्यूज- तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पधेत १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटात न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विदयालयातील मुले व मुली चा संघ ,१९ वर्ष वयोगटात हनुमान विदयालय टाकळी खातगाव, मुले व मुली या संघाचा प्रथम क्रंमाक मिळवला.या सघांची जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड झाली.
जिल्हा क्रिडा विभाग अहमदनगर जिल्हा व वर्का स्कूल व न्यू कॉलेज अरणगाव, तालुका क्रिडा समिती याच्या संयुक्त विदयमाने तालुकास्तरीय पावसाळी व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध मध्ये १४ वर्ष वयोगटात ९ संघ, १७ वर्ष वयोगट १७ संघ, १९ वर्ष वयोगटात पाच या संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धत मुले १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटात द्वितीय क्रंमाक नवभारत विदयालय, तृतीय वर्का स्कूल, १९ वर्ष वयोगटात द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल वाळकी संघ, विजयी झाला तर मुलीचा १४ वर्ष वयोगटात ज्ञानदिप विदयालय सोनेवाडी, १७ वर्ष वयोगटात न्यू इंग्लिश स्कूल वाळकी मुलीचा संघ, तर १९ वर्ष वयोगात वर्का स्कूल मुलीने दुसरा क्रंमाक मिळवून विजयी झाले.
या सामन्यात अर्षद खान, विशाल लांडगे, अशरफ खान, गणेश नागापुरे, आदित्य जपकर, हर्षात कांबळे, अभि कांबळे, अभिषेक ढगे यांनी उत्कृष्ट खेळी केली.या स्पर्धाचे उद्घाटन माजी जिल्हा परीषद सदस्य राणी लंके, जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रिडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरागे, प्राचार्य डॉ. एच, एन.रामीन, प्राचार्य मिताली वाजपेयी, मुलानी मुर्शरफ, मोबीना शेख, ज्योती सोनवणे,अभिजीत शर्मा, अनिल शिंदे, तालुका अध्यक्ष महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिरीष टेकाडे, क्रिडा समितीचे उपाध्यक्ष मिलिंद थोरे, वैभव शिंदे, संतोष रोहकले, सतीष सुंबे, भगवान मते, अशोक पवार, सिताराम बोरुडे, अशोक रक्ताहे, हरी खेडकर, प्राविण शिंदे, भगवान रेंगडे उपस्थित होते.
या स्पधेत मोमीन शह|दाब,रुतीक विटकर, अल्फेश शेख यांनी पंच म्हणून काम पाहीले यावेळी वृक्षारोपन करण्यात आले.
चौकट- क्रिडा स्पर्धा मध्ये बहुतेक शाळा सहभाग घेत नाही.तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये भाग न घेणाऱ्या शाळावर कार्यवाही करणार आहे. या शाळाबाबत शिक्षण विभागाला कळवणार असल्याचे तालुका क्रिडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी यावेळी सांगीतले.