शिक्षक मान्यता संबंधीचे नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा-

 शिक्षक मान्यता संबंधीचे नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा-

 राजेंद्र निमसे
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची प्रधान शिक्षण सचिवांकडे निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर- महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची संचमान्यता करताना सुधारीत निकष नुकतेच  जाहीर करण्यात आले  आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर सदरचा शासननिर्णय रद्द करण्यात येऊन बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ तील मुळ तरतुदी प्रमाणे संचमान्यता करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्याचे प्रधान शिक्षण सचिव यांना  निवेदनाद्वारे केल्याची माहिती संघाचे राज्यसंघटक तथा जिल्हा विकास मंडळाचे विद्यमान संचालक  राजेंद्र निमसे आणि अहमदनगर जिल्हा प्राथ शिक्षक  ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण यांनी दिली.
      नुकतेच शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी शासननिर्णय पारीत करुन सन २०२४-२५ साठी संच मान्यतेचे सुधारित निकषास मान्यता दिली आहे. हे निकष देशाच्या शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहेत. राज्यातील २० पेक्षा कमी पट असलेल्या वाडी वस्ती ,तांडे व दुर्गम तसेच आदिवासी बहुल क्षेत्रातील हजारो प्राथमिक वर्गाकरिता एकच शिक्षक मिळणार आहे. तसेच  दहा पटाच्या आतील शाळेला सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचे धोरण शासनाने राबवले आहे.एकीकडे राज्यात हजारो डीएड पात्रता  धारक विद्यार्थी नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूका देवून शासन तरुण शिक्षकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे अक्षम्य पाप करीत आहे.तर दुसरीकडे एका शिक्षकास २ ते ३ वर्गाचे अध्यापन करावे लागणार आहे .त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शाळेत शिकणाऱ्या बालकांना शिकविण्यास पुरेसे शिक्षक उपलब्ध होणार नाहीत आणि त्याचा विद्यार्थ्यांचा गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.
पटसंख्या १३५ पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद राहणार नाही , त्यामुळे राज्यातील अनेक शाळा मुख्याध्यापकाविना असणार  आहेत. त्याचा शाळेच्या व्यवस्थापनावर परिणाम होऊन शिक्षकांना  पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होणार  नाहीत .हे निकष नैसर्गिक न्यायास धरुन नाहीत असे अखिल संघाचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे यांनी स्पष्ट केले .
शाळेतील वर्गामधील  तुकडी संकल्पना संपुष्टात आणल्यामुळे वर्ग तेवढे शिक्षक अशी स्थिती बहुसंख्य शाळांमध्ये निर्माण होईल. बहुवर्ग अध्यापनामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार असून अध्यापनासाठी आवश्यक उर्जा उत्साह शिक्षकांमध्ये राहणार नाही. उच्च प्राथमिक  शाळांमधील सहावी  व आठवीचा विद्यार्थी पट २० पेक्षा कमी असल्यास, तेथे शिक्षकाचे एकही पद मंजूर होणार नसल्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील हजारो उच्च प्राथमिक  शाळेतील वर्गास  शिक्षक उपलब्ध होणार नाहीत,
इंग्रजी शाळा  व खाजगी विनाअनुदानित शाळेचे पेव  फुटलेले असतांना सार्वजनिक शिक्षणव्यवस्था शेवटची घटका मोजत आहे. संचमान्यतेचे नवीन निकष सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मोडीत काढणारे असून  हे नवीन निकष रद्द करून शिक्षण हक्क कायद्यातील मुळ तरतुदी प्रमाणे संचमान्यतेचे निकष कायम ठेवावे असे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,सरचिटणीस कल्याण लवांडे   राज्यसंघटक राजेंद्र निमसे , संघाचे जिल्हा नेते बाळासाहेब कदम ,जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर , ऐक्य मंडळाचे नेते विष्णू बांगर , ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले ,  संजय शेळके ,   विष्णू चौधरी,   सुधिर बोऱ्हाडे ,दत्तात्रय परहर ,ऐक्य मंडळ जिल्हाध्यक्ष  प्रदीप चक्रनारायण ,अखिल डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप  भालेराव , अखिल पदवीधर चे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद , जिल्हानेते राजकुमार शहाणे , पावलस गोर्डे ,संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे , मधुकर डहाळे , विलास लवांडे , महेश लोखंडे , ज्ञानदेव कराड , प्रकाश पटेकर , भाऊसाहेब घोरपडे , नितीन थोरात ‘ बजरंग बांदल ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता उदबत्ते , जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके , बँकेच्या माजी संचालिका संगीता राजेद्र  निमसे , जिल्हा संयुक्त चिटणीस मनिषा क्षेत्रे , संगीता निगळे , नगर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सविता नागरे ,नगर संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग देवकर ,पारनेर संघाचे अध्यक्ष  लक्ष्मण चेमटे , ऐक्य मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष , ठाणगे , रवींद्र अनाप ,संजय सोनवणे ,जनार्दन काळे , प्रताप कदम , बथूवेल हिवाळे ,उद्धव डमाळे  ,नंदू गायकवाड , शिवाजी माने ,सुखदेव डेंगळे  बंडू नागरगोजे , लक्ष्मण जटाडे राजेंद्र सोनवणे , शहाजी जरे, प्रदीप कांबळे , विनायक गोरे , अशोक दहिफळे , प्रविण शेळके , रविंद्र दरेकर ,  संजय कांबळे , वर्षा शिरसाठ , शितल ससे , आदिनाथ पोटे , राजेंद्र गांगर्डे , वि ।शाल कुलट ,  राहुल व्यवहारे , अमोल मुरकुटे , प्रविण खाडे , आदिल शेख संजय थोरात , भाऊसाहेब घोरपडे , सर्जेराव ससाणे  यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *