गुणवडी ता.नगर येथे पोळ्याचे जंगी नियोजन…
अशोक शेळके व पै.रवींद्र शेळके यांचा स्तुत्य उपक्रम…
देविदास गोरे
रुईछत्तिशी – पोळा हा सण शेतकऱ्यांची दिवाळी मानला जातो.आपल्या बैलांची पूजा करुन शेतकरी राजा बैलांप्रती प्रेमभाव व्यक्त करत असतो. पोळा सणानिमित्त गुणवडी ता.नगर येथे अशोक शेळके व पै. रविंद्र शेळके यांच्या स्तुत्य नियोजनातून पोळ्याचे जंगी नियोजन करण्यात येणार आहे.दरवर्षी हा उपक्रम ते राबवत असतात.ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीने पोळा उत्सव सजणार आहे.नगर तालुक्यात खूप मोठा उत्सव हा शेळके परिवार साजरा करत असतो.खास पोळ्यानिमित्त कर्नाटक वरून ५.५१०००/- रुपयांच्या दोन बैलजोड्या आणण्यात आल्या आहेत.गावातून या बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
पुण्यातील सुप्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली जाणार आहे.१४ सप्टेंबर रोजी ठीक ५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी देखील नगर तालुक्यात सर्वात मोठा श्रावणी पोळा गुणवडी गावात उत्साहात साजरा करण्यात आला होता.यंदा देखील जंगी नियोजन करण्यात आल्याने पंचक्रोशीतून या शेळके परिवाराचे कौतुक केले जात आहे.सर्वांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन अशोक व रवींद्र (बापू ) शेळके मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.