नगर ब्रेकींग न्यूज
रुईछत्तिशी येथील विकासकामांना गती मिळणार – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले.
विविध विकासकामांचे कर्डिले यांना निवेदन..
देविदास गोरे
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी येथील विविध विकास कामांचे निवेदन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना देण्यात आले.गावातील मारुती मंदिर प्रांगण समोरील सभामंडप , पाणंद रस्ते , स्मशानभूमीसाठी भरीव निधी , गावातील रस्ते याविषयी विचार विनिमय करून कामे सुचविण्यात आली.गावात अनेक कामे मंजूर करण्यासाठी खासदार सुजय विखे , आमदार बबनराव पाचपुते तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन कर्डिले यांनी दिले.नगर – नेवासा मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना रुईछत्तिशी गावाने खूप मोठे सहकार्य केल्याचे माजी मंत्री , जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.आगामी काळात नगर सोलापूर रस्त्यावरील रुईछत्तिशी गावची बाजारपेठ अजून प्रकाशझोतात येणार आहे.पंढरीला जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे मुक्कामी असतात त्यांच्या निवासासाठी देखील मोठे निवासस्थान उभारण्याची ग्वाही कर्डिले यांनी दिली. रुईछत्तिशी येथील सोसायटीची इमारत , जिल्हा सहकारी बँकेची इमारत , व्यापारी संकुल इमारत एकत्र होणार असल्याने सर्व सोसायटी संचालक त्यांनी विशेष कौतुक केले.निवेदन देताना सोसायटीचे चेअरमन रमेश भांबरे , सरपंच विलास लोखंडे , व्हा. चेअरमन भरत भुजबळ , माजी सरपंच श्रीकांत जगदाळे सर , माजी सभापती राम साबळे ,प्रशांत वाळके , दत्तात्रय पवार , दत्तू जगदाळे , शरद गोरे , बाबासाहेब पवार , धनंजय खाकाळ , सुनील जगदाळे , संजय खाकाळ , राजू लोखंडे , रोहिदास भांबरे आदी उपस्थित होते.