खेळाडू नी खेळाकडे संधी म्हणून पहावे -सानप
नगर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा
स्पर्धेसाठी विदयार्थीचा मोठा सहभाग
नगर ब्रेकींग न्यूज -क्रिडा क्षेत्रात विदयार्थीनी चांगले यश मिळवले तर शासकीय सेवत नोकरीची संधी उपलब्ध होते . तेव्हा प्रत्येक खेळाडू नी खेळाकडे संधी म्हणून पाहायचे आहे असे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यानी केले.
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा परीषद, नगर तालुका क्रिडा समिती , व नवनाथ विदयालय यांच्या वतीने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.या वेळी सानप म्हणाले अशा स्पर्धा मधून विदयार्थिनी शिकवण घ्यायची आहे.अपयश आले तर खचून न जाता नव्या उमेदीने दुसऱ्या विजेत्या खेळाडू कडे पाहून प्रगती करत रहायचे. प्रत्येकाने महाराष्ट्र केसरी व्हायचे आहे.कुस्ती क्षेत्रामुळे खेळाडूना पोलीस खात्यात चागल्या पदावर शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. नॅशनल प्रमाणपत्र, पदके मिळाली तर खेळाडूना आरक्षण आहे.ते०हा विदयार्थीनी अशा संधीचे सोने करावे. यावेळी सुभाष सोनवणे,ज्येष्ट क्रिडा शिक्षक चद्रंकांत पवार, क्रिडा समिती अध्यक्ष महेंद्र हिंगे,विष्णु खोसे,मिलिंद थोरे, बाबासाहेब भोर, मल्हारी कांडेकर, रमाकांत दरेकर, गणेश जाधव, बबन कांडेकर, भाऊसाहेब जाधव,समीर पटेल, सोमनाथ राऊत, बाबासाहेब बोडखे, ब्रदीनाथ सुंबे, कैलास कोरके, सीताराम बोरुडे, प्रताप बांडे, अरुण गोंडाळ, सुभाष गोंडाळ नवनाथ म्हस्के, अनिल कारले ,दादासाहेब खेडकर सह विदयार्थी उपस्थित होते.