हिवरे बाजार ग्रामस्थांनी एकत्रित साजरा केला दिपोत्सव !
साडे आठशे पणत्या प्रज्वलित
अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी १० मिनिटे मौन
हिवरे बाजार : प्रतिनिधी
साडेआठशे वर्षानंतर श्रीराम अध्योत्येत आल्याचे औचित्य साधत हिवरे बाजारमध्ये दीपावलीच्या पावनपर्वात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ८५० दिव्यांचा दीपोत्सव पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दीपोत्सव साजरा करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला.
अंधारकातून प्रकाशाकडे जाणारा प्रत्येक कुटुंबातून १ दिवा(पणती),सर्व संस्थेची एक पणती व प्रत्येक मंदिराचा एक दिवा, लोकसहभागाची १० मिनिटांच्या दिव्यांच्या प्रकाशात मौन करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ,जलस्त्रोतात दिवे सोडून पूजन दरवर्षी जलस्त्रोत भरलेले राहू दे आणि शेती समृद्ध होऊ दे यासाठी जलदेवतेची आराधना अशा ३ तत्वांवर प्रत्येक वर्षी दीपावलीच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामस्थ,आप्तेष्ट एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
८५० वर्षानंतर पुन्हा श्रीराम अयोध्येत आले.त्यानिमित्ताने ८५० दिवे प्रज्वलित करण्यात आले.दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विशेष निमंत्रित म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांना निमंत्रणानुसार भव्यदिव्य सोहळ्यास उपस्थित राहिले.आणि श्रीरामलल्लाची मूर्ती घडविताना काही अंश जगातील ३०० भाग्यवंताना पाठविले होते त्याचाच एक शिलांश पोपटरावांच्या रूपाने हिवरे बाजारला मिळाला आणि मोठ्या धूमधडाक्यात ग्रामस्थांनी रामनवमीच्या मुहर्तावर अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने शिलांशाची प्रतिष्ठापना श्रीराममंदिरात हिवरे बाजारमध्ये केली.
१४ वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येत आले त्यावेळेस अयोध्या वासियांनी दिप प्रज्वलित करून श्रीरामांचे स्वागत केले.तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी केली आणि तो हिंदू संस्कृतीतला अंधकारातून प्रकाशाकडे जाणारा दीपावली उत्सव देश विदेशी भारतीय मोठ्या आनंदाने साजरा करतात.म्हणून अयोध्या येथे साजरा करण्यात येणारा दीपोत्सव अंशरूपाने हिवरे बाजार मध्ये साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
रामराज्यात गावे स्वावलंबी व समाज निरोगी व आनंदी होता जातिधर्मात कुठलाही भेदभाव नव्हता त्या विचारांवर हिवरे बाजारमध्ये कामे झाली.
गेली ३५ वर्षात ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदान,प्रामाणिकपणे सहकार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, निर्भिड पत्रकार,गुणवतदायी कामे करणारे ठेकेदार या सर्वांनी दिलेले प्रामाणिक योगदान म्हणून स्वावलंबी गाव उभे राहिले. गेली अनेक पिढ्यांचे पुण्य फलित झाले म्हणून दरवर्षी हिवरे बाजारमध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
यावेळी कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे,हिवरे बाजार वि.का.से.सो.चेअरमन छबूराव ठाणगे,व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर,रोहिदास पादीर ग्रा.पं.सदस्य,बाबासाहेब गुंजाळ व्हा चेअरमन मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्था,तरुण मंडळ ,महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.