तालुकास्तरीय कुस्ती च्या सामन्यात
बाणेश्वर विदयालय बुऱ्हाणनगर, सारोळा कासार, काकासाहेब म्हस्के विदयालय मांडवे, प्रियदर्शनी विदयालय भिंगार, जनता विदयालय रुईछत्तीसी, न्यू इंग्लिश स्कूल हिगंणगाव विदयालयातील मुले व मुलींची जिल्हा पातळीवर निवड.
नगर ब्रेकींग न्यूज- तालुका स्तरीय कुस्ती स्पर्ध मध्ये बाणेश्वर विदयालय बुऱ्हाणनगर, सारोळा कासार, काकासाहेब म्हस्के विदयालय मांडवे, प्रियदर्शनी विदयालय भिंगार, जनता विदयालय रुईछत्तीसी, न्यू इंग्लिश स्कूल हिगंणगाव विदयालयातील मुले व मुलींची जिल्हा पातळीवर निवड.
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा परीषद, नगर तालुका क्रिडा समिती , व नवनाथ विदयालय यांच्या वतीने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.
तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा कुस्ती मध्ये फ्री स्टाइल- ग्रिको रोमन गटात मुले ११ तारखेला व मुलीच्या १२ तारखेला स्पर्धा झाल्या. वन विभागाचे अधिकारी उबाळे, हनुमान विदयालय टाकळी खातगाव चे मुख्याध्यापक सुभाष नरवडे यांच्या हस्ते मुलींच्या कुस्त्या लावण्यात आल्या. विजयी विदयालय-कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सारोळा कासार – तूषार धामणे, यश ठोकळ, प्रबुद्ध रामफळे, गौरव साळवे, निखिल जाधव. काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालय, मांडवे – स्वस्तिक भोगाडे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कापूरवाडी – कानिफनाथ दुसुंगे. बन्सीभाऊ म्हस्के माध्यमिक विद्यालय टाकळी काझी – रोहित बोरूडे .प्रियदर्शिनी पब्लिक स्कूल, भिंगार-
पृथ्वीराज जाधव, वेदांत शिंदे, वीरेन लांडगे. न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव – साई कांडेकर. संतुकनाथ विदयालय जेऊर – किरण मगर. जनता विद्यालय रुईछत्तीसी- सोमनाथ काले॔ .भांबरे कॉलेज – सुमित फुलमाळी,-अनिल फुलमाळी,हर्षद कोतकर
नेप्ती विद्यालय, नेप्ती -प्रतिक राऊत. बाणेश्वर माध्यमिक विद्यालय बुऱ्हाणनगर – ओंकार थोरात, विक्रांत निकळे, विशाल कुल्लाळ, ओम दुसंगे, कृष्णा घायव, अनिकेत धाडगे, मयूर लिमगिरे, आशिष वारुळे, पृथ्वीराज जाधव, पानसरे स्वराज, सुरज काळे, उत्कर्ष कर्डिले अभिजीत वाल्हेकर, सिद्धार्थ कर्डिले, आशिष लबडे, आदित्य लबडे या विदयार्थीनी प्रथम क्रंमाक मिळवला. या विद्यार्थीची जिल्हा पातळीवर निवड झाली. यावेळी ज्येष्ट क्रिडा शिक्षक चद्रंकांत पवार, क्रिडा समिती अध्यक्ष महेंद्र हिंगे, मिलिंद थोरे, बाबासाहेब भोर, मल्हारी कांडेकर, रमाकांत दरेकर, गणेश जाधव, बबन कांडेकर,भाऊसाहेब जाधव,समीर पटेल, सोमनाथ राऊत, बाबासाहेब बोडखे, ब्रदीनाथ सुंबे, कैलास कोरके, सीताराम बोरुडे, प्रताप बांडे, सह विदयार्थी उपस्थित होते.