नगर तालुक्यातील १०५ गावात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे आयोजन करणार
०४ सप्टेंबर रोजी आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुभारंभ – तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के यांची माहिती
जिल्हा काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन समारंभ देखील संपन्न होणार आहे.
अहमदनगर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार राज्यात दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या काळात भारतीय जनता पक्षाचे नऊ वर्षाच्या कार्यकाळातील शेतकरी विरोधी व महागाई आणि बेरोजगारी बाबतच्या धोरणांचा जनसामान्य माणसात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अन्यायकारक धोरणांचा जनतेसमोर आणण्यासाठी तालुका काँग्रेसच्या माध्यमातून जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील १०५ गावात या जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण म्हस्के यांनी दिली.
जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित नगर तालुका काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हस्के म्हणाले या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यापासून माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सदर जनसंवाद यात्रा भुईकोट किल्ला ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय, जुना कापड बाजार, मार्गे आशा टॉकीज पासून माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुरुडगाव रोड येथील ईगल प्राइड येथे जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रांगणात सदर जनसंवाद यात्रेचा समारंभ होणार समारोप होणार आहे. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन समारंभ देखील संपन्न होणार आहे.
या जनसंवाद पदयात्रेच्या शुभारंभाचे कार्यक्रमासाठी नगर तालुक्यातील तालुका काँग्रेस युवक काँग्रेस सेवादल व सर्व संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अरुण म्हस्के यांनी केले आहे.