डिग्रस शाळेत राबवलेला एक मुल एक झाड उपक्रम स्तुत्य-पंजाबराव डक
राहुरी – राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गिरिकर्णीका ग्लोबल फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवत असलेला एक मुल एक झाड उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी निश्चितच उपयोगी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. डक पुढे म्हणाले की सद्यस्थितीत पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढते. पावसावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे डिग्रस शाळेतील विद्यार्थी वृक्ष संवर्धनाच्या कामात अग्रेसर आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे.शाळेत केलेल्या वृक्षारोपणाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली . विद्यार्थ्यांनी त्यांची मुलाखत घेतली तुमचे पूर्ण नाव काय आहे? तुमचे नाव पंजाब असे का ठेवले? हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी तुम्ही विशिष्ट पदवी घेतली आहे काय? हवामानाचा अंदाज सांगताना तुम्ही कोणत्या गोष्टींचा अभ्यास करता? तुम्ही कोणत्या शाळेत शिकले आहात? चांगला पाऊस होण्यासाठी काय केले पाहिजे? अवकाळी पाऊस का होतो? यासह अनेक प्रश्न विचारले.या प्रश्नांना पंजाब डक यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
पंजाब डक यांची भेट घडवून आणण्यासाठी डिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बेल्हेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगेश बेल्हेकर, सुरेश दांगट,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चोरमले आदी उपस्थित होते. सदर मुलाखत यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील सोनवणे, राजकुमार साळवे, गोकुळ अंत्रे,वंदना जाधव, प्रज्ञा लगड, शितल धस, मुकेश कचरे, रवींद् अरगडे,रोहिणी अरगडे आदींनी प्रयत्न केले
मुलाखतीचे सूत्रसंचालन रवींद्र अरगडे यांनी केले तर राजकुमार साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.